20 September 2020

News Flash

Blast at Chembur BPCL Plant: चेंबूरमधील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी प्लांटमध्ये मोठा स्फोट; ४५ कर्मचारी जखमी

Blast at Chembur BPCL Plant: मुंबईत चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियमच्या प्लान्टमध्ये मोठा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटाच्या आवाजाने माहुलगाव हादरलं असून अग्निशमन दलाच्या पाच

Fire at BPCL plant in Chembur

Fire at BPCL plant in Chembur : मुंबईत चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियमच्या रिफायनरीमधील हायड्रो-क्रॅकर युनिटमध्ये बॉयलरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण माहुलगाव हादरले. या स्फोटात ४५ कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात येते. ४५ जखमींपैकी काही जणांवर बीपीसीएलच्या मेडिकल सेंटरमध्ये उपचार करून सोडण्यात आले तर काहींना चेंबूर येथील सुश्रूत रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही किलोमीटरचा परिसर या स्फोटाने हादरला त्यावरुन स्फोटाची तीव्रता लक्षात येते. अग्निशमन दलाच्या पंधराहून अधिक गाडया आग विझविण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. दुपारी तीन वाजता हा स्फोट झाला. रिफायनरमधील बॉयलरचा स्फोट होऊन आग भडकली.

बीपीसीएलचा अग्निशमन विभाग आणि मुंबई अग्निशमन दल ही आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. या रिफायनरी प्लान्टच्या बाजूला झोपडपट्टीचा परिसर आहे. खबरदारी म्हणून या झोपडपट्टीतल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. माहुलमध्ये भारत पेट्रोलियमचे मोठे रिफायनरी प्लांन्टस आहेत.

स्फोट झालेल्या ठिकाणी नेमकी किती जिवितहानी झाली ते अद्याप समजू शकलेले नाही पण काही कामगार आग लागलेल्या ठिकाणी अडकले आहेत अशी माहिती शिवसेना आमदार तुकाराम काते यांनी दिली. बीपीसीएलच्या हायड्रोक्रॅकर प्लांटमध्ये स्फोट झाल्याची माहिती असून त्या बाजूला आणखी एका प्लांट आहे. या परिसरात मोठया प्रमाणावर तेल टाक्या असून ही आग पसरण्यापासून रोखण्याचे मोठे आव्हान आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते. चेंबूर परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2018 3:22 pm

Web Title: blast at chembur bpcl palnt
टॅग Blast,Chembur
Next Stories
1 मुंबईतील अकरावीचे ३२ हजार विद्यार्थी अद्यापही प्रवेशाविना
2 घाटकोपर बॉम्बस्फोट : फरार आरोपीला औरंगाबादमधून अटक
3 ‘तुमचं काम सिनेमा दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नाही’, उच्च न्यायालयाने फटकारलं
Just Now!
X