News Flash

धावत्या लोकलमध्ये अंध तरुणीचा विनयभंग

चर्चगेटहून बोरिवलीला जाणाऱ्या एका लोकलमध्ये खार ते सांताक्रूझदरम्यान ऐन दुपारी गर्दीच्या वेळेत हा प्रकार घडला आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर धावत्या लोकलमध्ये एका तेवीस वर्षीय अंध तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला. चर्चगेटहून बोरिवलीला जाणाऱ्या एका लोकलमध्ये खार ते सांताक्रूझदरम्यान ऐन दुपारी गर्दीच्या वेळेत हा प्रकार घडला आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर धावत्या लोकलमध्ये एका तेवीस वर्षीय अंध तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला. चर्चगेटहून बोरीवलीला जाणाऱ्या एका लोकलमध्ये खार ते सांताक्रुझदरम्यान ऐन दुपारी गर्दीच्या वेळेत हा प्रकार घडल्याने महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात
आहे.
विशेष म्हणजे डब्यातील अन्य प्रवाशांनी बघ्याची भूमिका घेतली. अंधेरी येथे नोकरी करत असलेल्या या तरुणीने दुपारी चर्चगेटहून नोकरीवर जाण्यासाठी बोरिवली लोकल पकडली. खार स्थानकात उतरताच एका तरुणाने तिला अपंगांच्या डब्यापर्यंत चढवून देत असल्याचे सांगून तिला मालडब्यात चढवले. यानंतर तरूणाने छेड काढण्यास सुरुवात केली. यावर मदतीसाठी या तरुणीने आरडाओरडा केला. मात्र मदतीची याचना करुनही अन्य कोणत्याही प्रवासी तिच्या मदतीला धावून आला नाही. यावर तिने स्वत: जवळील काठीने त्याला चोप देण्याचा सुरुवात केली. आणि या प्रसंगातून स्वत:ची सुटका करुन घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 12:01 am

Web Title: blind woman molested in local
Next Stories
1 बँकेचे व्यवहार आजच करा, उद्यापासून चार दिवस बँका बंद
2 हिट अॅंड रन प्रकरणी सलमानविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय
3 भारतात परतण्यासंबंधीचा दाऊदचा दावा खोटा – एम. एन. सिंग
Just Now!
X