News Flash

लोकलच्या दरवाजांवर निळे दिवे

रेल्वे अपघात टाळण्यासाठी क्लृप्ती

संग्रहित छायाचित्र

रेल्वे अपघात टाळण्यासाठी क्लृप्ती

रेल्वे अपघात टाळण्यासाठी लोकलच्या दरवाजावर इशारे देणारे निळे दिवे बसवण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.धावती लोकल पकडणाऱ्यांना धोक्याचा इशारा देण्यासाठी किंवा प्रवासी चढत असताना लोकल सुरू झाल्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी ही क्लृप्ती योजण्यात आली आहे. लोकल सुरू होताना हे दिवेही पेटतील आणि प्रवाशांना सूचना मिळून अपघातांची संख्या घटेल, असा रेल्वे प्रशासनाचा होरा आहे.

अनेकदा लोकल सुरू होणार असल्याचे लक्षात न आल्यामुळे प्रवासी पडून अपघात होतात. फलाटावरील गाडी धावत जाऊन पकडण्याचा प्रयत्नही अनेक प्रवासी करतात. धावती गाडी पकडण्याचा प्रयत्न केल्यामुळे फलाट आणि गाडीच्या मधल्या फटीत सापडल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. या पाश्र्वभूमीवर प्रवाशांना लोकल सुरू होत असल्याची सूचना देण्यासाठी दारावर निळे दिवे बसवण्यात येणार आहेत. दरवाजाच्या वरच्या बाजूचा दिवा गाडी सुरू होताना लागेल आणि प्रवाशांना गाडी सुरू होत असल्याची सूचना मिळेल. सध्या मध्य रेल्वेवरील लोकल गाडय़ांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हे दिवे लावण्यात येणार आहेत.

‘दुर्घटना टळतील’

‘दरवाजावरील निळ्या दिव्यामुळे शेवटच्या क्षणी लोकलमध्ये चढताना होणाऱ्या दुर्घटना टाळता येतील,’ असे ट्वीट रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे. गोयल यांनी काही दिवसांपूर्वीच रेल्वेचे वाढते अपघात रोखण्याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 12:43 am

Web Title: blue lamps on the local train door
Next Stories
1 राष्ट्रवादीने प्रतिमा जपली!
2 आर्थिक दुर्बल आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी
3 शालान्त परीक्षोत्तर शिष्यवृत्तीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ
Just Now!
X