03 March 2021

News Flash

‘ब्लू मून’ पर्वणी शनिवारी

येत्या ३१ ऑक्टोबरला रात्री ८.१९ वाजता हा ‘ब्लू मून’ दिसणार आहे

(संग्रहित छायाचित्र)

महिन्यातून एकदा होणारे पूर्ण चंद्राचे दर्शन, चालू महिन्यात दोनदा होणार आहे. एकाच महिन्यात दोनदा पूर्ण चंद्र दिसल्यास त्यातील दुसऱ्या पूर्ण चंद्राला इंग्रजीत ‘ब्लू मून’ असे म्हटले जाते. येत्या ३१ ऑक्टोबरला रात्री ८.१९ वाजता हा ‘ब्लू मून’ दिसणार आहे. या महिन्यातील पहिले पूर्ण चंद्र दर्शन २ ऑक्टोबरला पहाटे २.३५ वाजता झाले होते.

एखाद्या दुर्मीळ प्रसंगाला  इंग्रजीत ‘वन्स इन अ ब्लू मून’ असे संबोधित केले जाते. या संबोधनाचा वापर १७ व्या शतकात पहिल्यांदा झाला. सर्वसाधारणपणे प्रत्येक महिन्याला एक, याप्रमाणे दरवर्षी १२ पूर्ण चंद्र दिसतात. मात्र, ‘ब्लू मून’च्या महिन्यात १३ पूर्ण चंद्र दिसतात. उगवणारा चंद्र खरेतर लालसर रंगाचा असतो. पण चंद्र जेव्हा क्षितिजापासून अधिक उंचीवर पोहोचतो तेव्हा पृथ्वीवरील परावर्तीत प्रकाशामुळे चंद्र पांढऱ्या रंगाचा दिसतो. त्यात करडय़ा छटा मिसळल्याने तो निळसर भासू लागतो. मात्र ‘ब्लू मून’च्या व्याख्येचा त्याच्या रंगाशी काहीही संबंध नाही.

पाश्चात्य देशांत ग्रीष्म, उन्हाळा, शरद, हिवाळा असे प्रत्येकी ३ महिन्यांचे चार ऋतू असतात. दर महिन्याला एक याप्रमाणे प्रत्येक ऋतूमध्ये तीन पूर्ण चंद्र दिसणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक पूर्ण चंद्र वेगळ्या नावाने ओळखला जातो. प्रत्येक चंद्रमास २९ दिवस, १२ तास, ४४ मिनिटे, ३८ सेकं दे इतक्या कालावधीचा असतो. प्रत्येक सौरवर्ष ३६५ दिवस, ५ तास, १९ मिनिटे, ३० सेकं दे इतक्या कालावधीचे असते. यानुसार प्रत्येक सौरवर्षांत पूर्ण १२ चंद्र वर्षे असतात. शिवाय १० दिवस आणि २०.९ तास अधिकचे असतात.

अधिकचा कालावधी साचत जातो आणि दर ३० महिन्यांनी एकदा अधिकचा पूर्ण चंद्र दिसतो. ‘ब्लू मून’ ज्या ऋतूत दिसतो त्या ऋतूमध्ये त्या वर्षी तीनऐवजी चार पूर्ण चंद्र दिसतात. अशावेळी तिसऱ्या पूर्ण चंद्राला ‘ब्लू मून’ म्हटले जाते. फेब्रुवारी कमी कालावधीचा असल्याने ‘ब्लू मून’ कधीच दिसू शकत नाही. ३० दिवसांच्या महिन्यात ‘ब्लू मून’चे प्रमाण अत्यल्प असते.

यापूर्वी आणि यानंतर..

यापूर्वी अशी घटना ३० जून २००७ रोजी घडली होती. यानंतर असा प्रसंग ३० सप्टेंबर २०५० रोजी येईल. २०१८ साली ३१ जानेवारी आणि ३१ मार्च अशा दोन दिवशी ‘ब्लू  मून’ दिसले होते. पुढील ‘ब्लू मून’ ३१ ऑगस्ट २०२३ रोजी दिसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 12:26 am

Web Title: blue moon will appear saturday abn 97
Next Stories
1 करोना चाचणी आता ९८० रुपयांत
2 सीएसएमटी टर्मिनसवर विमानतळाप्रमाणे सोयीसुविधांयुक्त वातानुकूलित प्रतीक्षालय
3 मुंबईच्या वीज संकटावेळी तुमची यंत्रणा का कोसळली?
Just Now!
X