News Flash

अनधिकृत पार्किंगवरील कारवाई फक्त २३ ठिकाणी

वाहनतळांचा वापर न करता लगतच्या रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग केले जात असल्याचा पालिकेचा दावा आहे.

मुंबईतील रस्त्यांवर बेकायदा पार्किंग करणाऱ्यांकडून दहा हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाचा वरळीतील महालक्ष्मी को. ऑप. सोसायटीच्या रहिवाशांनी निषेध केला. राष्ट्रवादीचे सचिन अहिर आणि अन्य पदाधिकारीही या आंदोलनात सहभागी झाले होते.    (छायाचित्र : निर्मल हरिंद्रन)

सात ठिकाणी मोफत वाहनतळ सुविधा, तरीही बेकायदा पार्किंग करणाऱ्यांना दंड

मुंबई : सार्वजनिक वाहनतळांच्या ५०० मीटर परिसरात गाडी उभी करणाऱ्यांविरोधात पालिकेने सुरू केलेल्या कारवाईमुळे संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मात्र पहिल्या टप्प्यात पालिकेने केवळ  २३ ठिकाणच्या सार्वजनिक वाहनतळांच्या परिसरात ही कारवाई सुरू केली आहे. या २३ ठिकाणच्या वाहनतळापैकी सात वाहनतळे मोफत आहेत. मुंबईकरांना त्यांच्या विभागातील नव्या वाहनतळांची सवय लावण्यासाठी पालिका प्रशासनाने हा कारवाईचा बडगा उचलला आहे.

महापालिकेची संपूर्ण मुंबईत १४६ ठिकाणी वाहनतळ असून त्यावर तब्बल ३४ हजार ८०८ वाहने उभी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र अनेक ठिकाणी वाहनतळांचा वापर न करता लगतच्या रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग केले जात असल्याचा पालिकेचा दावा आहे. त्यामुळे नागरिकांना गाडय़ा वाहनतळांवरच उभ्या करण्याची सवय लागावी म्हणून ही कारवाई केली जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. पालिकेकडे असलेल्या वाहनतळांपैकी रस्त्यांवरील सशुल्क वाहनतळ (पे अ‍ॅण्ड पार्क) आहेत तर काही वाहनतळ विकासकांकडून ताब्यात घेतले आहेत. विकासकांकडून ताब्यात घेतलेल्या वाहनतळांची संख्या २६ आहे. त्यापैकी २३ वाहनतळांच्या परिसरात सध्याची कारवाई सुरू असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. उर्वरित ३ ठिकाणी सार्वजनिक वाहनतळ लवकरच सुरू होणार आहेत. त्यामुळे सध्या फक्त २३ वाहनतळांच्या परिसरातच ही कारवाई सुरू आहे.

या २३ वाहनतळांपैकी ७ वाहनतळांवर अद्याप कंत्राटदार न नेमल्यामुळे पालिकेने या ठिकाणी मोफत पार्किंगची सोय ठेवली आहे. या वाहनतळाच्या ५०० मीटर परिसरात गाडी उभी केल्यास चालकांना दंड भरावा लागणार आहे.

ही सात वाहनतळे मोफत

* श्रीनिवास कॉटन मिल, सेनापती बापट मार्ग लोअर परेल, जी दक्षिण

* विकास पलाझो बिल्डिंग, पं. जवाहरलाल मार्ग आणि पं. मदन मोहन मालवीय मार्गाच्या चौकाजवळ टी वॉर्ड

* एलफिन्स्टन मिल, इंडिया बुल फायनान्स सेंटर, सेनापती बापट मार्ग, माहीम, जी दक्षिण मुंबई मिल, द पार्क कमला मिलच्या पुढे, लोअर परेल, जी दक्षिण हब मॉलजवळ, पश्चिम द्रुतगतीजवळ, पहाडी, गोरेगाव, पूर्व (पी दक्षिण)

* द अ‍ॅड्रेस, आर सिटी मॉलजवळ, एलबीएस, विक्रोळी पश्चिम, एन वॉर्ड

* रुणवाल बिल्डिंग, ओशिवरा लिंक रोड, अंधेरी पश्चिम, के वेस्ट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 3:19 am

Web Title: bmc action on unauthorized parking only at 23 places zws 70
Next Stories
1 खड्डे पडले तरी पालिकेचे अ‍ॅप बेपत्ता
2 खारफुटींच्या कत्तलींना सरसकट परवानगी नको!
3 पालिका रुग्णालयांना चोख सुरक्षा
Just Now!
X