मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच बोनस मंजूर करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी पुढील काही दिवसांत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून त्याआधीच मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये बोनस मिळणार आहे.

दरम्यान दुसरकीडे बुधवाारी केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एक खूशखबर दिली. महिनाभरावर आलेल्या दिवाळीनिमित्त रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनसची घोषणा करण्यात आली. सरकारच्या या निर्णयामुळे ११ लाख कर्माचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. केंद्र सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला.

दिवाळीला अजून एक महिन्याचा कालावधी शिल्लक असताना रेल्वे मंत्रालयाकडून आपल्या कर्मचाऱ्यांना खूशखबर देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या वेतनाइतका बोनस दिला जाणार आहे. याचा फायदा रेल्वेच्या ११ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. सलग सहाव्या वर्षी पहिल्यांदाच रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस दिला जात असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती देताना सांगितले.