मालमत्ता खात्याकडून घराच्या भाडेकरू हस्तांतरण प्रक्रियेला सोपे स्वरूप आणि कालमर्यादा देण्यासाठी पालिकेने अर्ज नमुन्यांचे सुलभीकरण केले आहे. पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या या अर्जाबाबत नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत.

पालिकेच्या एफ दक्षिण विभागातील मालमत्ता खात्यामधील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काही महिन्यांपूर्वी पकडले होते. हस्तांतरणासाठी निश्चित पद्धती; तसेच ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे बंधन नसल्याने याचा गैरफायदा घेतला जात होता. ही बाब लक्षात घेऊन वारसा हक्काने मालमत्ता भाडेकरू हस्तांतरण व खरेदी-विक्रीने मालमत्ता भाडेकरू हस्तांतरण असे दोन उपप्रकार असलेल्या दोन पानी अर्ज नमुना मालमत्ता विभागाने प्रस्तावित केला आहे. सूचना नागरिकांनी २६ ऑक्टोबरपर्यंतूंac.estate@mcgm.gov.in,mailto:ac.estate@mcgm.gov.in  या ईमेलवर पाठवायच्या आहेत.