बॅकबे ते माहुल मार्गावरील घटना

मुंबई :  गळकी बस चालवताना हैराण झालेल्या बेस्ट बस चालकाने एका हातात छत्री व दुसऱ्या हाताने बस चालवत नेण्याचा प्रकार बुधवारी घडला. याची चित्रफीत समाजमाध्यमांवर फिरताच बस आणि त्या चालकाची माहिती बेस्ट उपक्र माकडून घेण्यात आली. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात येणार आहे.

बस क्र मांक २५ ही बॅकबे ते माहुलपर्यंत धावते. मुसळधार पावसात या बसच्या छतामधून पाणी गळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे प्रवासीही हैराण झाले. चालक बसलेल्या जागीही छतामधून पाणी पडत असल्याने चालकाने छत्री घेऊन बस चालवण्यास सुरुवात के ली. या प्रकाराची एका प्रवाशाने काढलेली चित्रफीत समाजमाध्यमांवर फिरल्यानंतर ही बस कोणत्या मार्गावरील आहे याचा तपास बेस्ट उपक्र माकडून के ला गेला.

याबाबत बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांना विचारले असता, ही बस बॅकबे आगारातील अससून ती टाटा कंपनीच्या विजेवर चालणाऱ्या बस आहेत. अशा ३०० बस जून महिन्यापर्यंत बेस्टच्या ताफ्यात दाखल होमार होत्या. मात्र आतापर्यंत १६० बसच दाखल झाल्या असून बस गळत असल्याच्या घटनेमुळे ताफ्यात दाखल झालेल्या सर्व बसची तपासणी करा, असे आदेश सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत. तर बस न तपासताच ती मार्गस्थ करणाऱ्यांचीही चौकशी होईल, अशी माहिती त्यांनी दिली. यात चालकाचा दोष नसून पाणी पडत असताना बस चालवणार कशी?, असा सवाल चेंबूरकर यांनी उपस्थित के ला.