मुंबई : पावसाला सुरुवात झाल्यापासून मुंबईत ठिकठिकाणच्या रस्त्यावर असंख्य खड्डे पडल्याचे मुंबईकरांचे म्हणणे असले तरी पालिकेच्या लेखी मात्र केवळ १०६ खड्डेच उरले आहेत. पालिकेकडे रस्त्यावरील खड्डय़ाच्या एकूण १०७० तक्रारी व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर अशा माध्यमातून आल्या आहेत त्यापैकी ९६४ तक्रारी सोडवण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

१० जून २०१९ ते ९ जुलै २०१९ या एका महिन्याच्या कालावधी दरम्यान पालिकेकडे १०७० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ज्यापैकी ९० टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजेच ९६४ तक्रारींचा निपटारा रस्ते खात्याद्वारे करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेच्या रस्ते खात्याचे प्रमुख अभियंता अरुण नाडगौडा यांनी दिली आहे.

स्थायी समितीमध्ये बुधवारीही खड्डय़ांच्या विषयावरून नगरसेवकांनी प्रशासनाला घरचा आहेर दिला. विरोधी पक्षनेते रवी राजा म्हणाले की, प्रशासनाने १४०० मेट्रिक टन कोल्डमिक्स तयार केले त्यातले १२०० मेट्रिक टन वॉर्डात दिले मग हे कोल्डमिक्स गेले कुठे असा सवाल त्यांनी केला. रस्त्यावर तर खड्डे पडले आहेत, मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त होणार कधी, किती दिवसात खड्डे बुजवणार असा सवालही त्यांनी केला.  ११०० रस्त्यांचे प्रस्ताव मंजूर केले मात्र त्यापैकी ३०० रस्त्यांवर हमी कालावधीतच खड्डे पडले आहेत, असाही आरोप रवी राजा यांनी केला.

तक्रारींसाठी सुविधा

’ कचरा उचलला जात नाही, रस्त्यावर खड्डे पडले, झाड वाकलेय, मॅनहोलचे झाकण तुटलेय अशा विविध तक्रारी करण्यासाठी महापालिकेचे  संकेतस्थळ तसेच १९१६ हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध आहे.

’ व्हॉट्सअ‍ॅप संदेश, संकेतस्थळ, दूरध्वनी यासारखे विविध पर्याय यंदा पालिकेने उपलब्ध करून दिले. ‘टउॅट 24७7‘ या महापालिकेच्या अँड्रॉईड अ‍ॅपमध्ये नागरिकांना त्यांच्या विविध तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. याच अ‍ॅपमध्ये रस्तेविषयक तक्रारींसाठी स्वतंत्र मोडय़ूल कार्यरत आहे.

’ त्याचबरोबर महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमधील रस्तेविभागातील अभियंत्यांचे व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सार्वजनिक करण्यात आले आहेत. ज्यावर रस्तेविषयक तक्रारी व्हॉट्सअ‍ॅप संदेशाद्वारे नोंदविता येणार आहेत.

खड्डय़ांच्या तक्रारी

’ अंधेरी के पूर्व –  १६१ तक्रारी

’ मालाड पी उत्तर – ९१

’ भांडुप, एस विभाग – ७८

’ अंधेरी प. के  पश्चिम – ७७

’ मुलुंड टी विभाग – ५१

’ ए विभाग — १४,

’ माझगाव डोंगरी बी वॉर्ड — १८,

’ चर्नीरोड सी विभाग — २४,

’ मलबार हिल डी विभाग — २०,

’ भायखळा ई— १८,

’ लालबाग एफ साऊथ — ४५,

’ वडाळा एफ नार्थ  — २८,

’ वरळी जी साऊथ  — ३२,

’ धारावी जी  — नॉर्थ  — १५,

’ वांद्रे एच पूर्व  — २९,

’ वांद्रे एच पश्चिम  — २०,

’ कुर्ला एल विभाग — ४५,

’ चेंबूर  एम पूर्व  — ३६,