मुंबई महानगरपालिकेचे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प बुधवारी पालिका सभागृहात मांडण्यात आला. मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ.सिताराम कुंटे यांनी हा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्षांसमोर सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात मागील वर्षापेक्षा २७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून ३१ हजार कोटींवरून मुंबई महापालिकेचे ‘बजेट’ यंदा ३३ हजार ५१४ कोटींपर्यंत गेले आहे.

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातील वैशिष्ट्ये-
– डांबरी, सिमेंट क्राँक्रीट ३ हजार २०९ कोटी रस्ते विकास
– सागरी (कोस्टल) मार्गासाठी २०० कोटींची तरतूद
– मुंबईला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी विशेष तरतूद
– मुंबईतील सर्व रस्त्यांवर सप्टेंबरपर्यंत एलईडी दिवे बसवणार
मुंबई महापालिका कर्मचाऱयांच्या आरोग्य विमा योजनेसाठी ७५ कोटींची तरतूद
– शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अखंड ज्योतीसाठी ५० लाखांची विशेष तरतूद
– कचरा गोळा करण्यासाठी ११४८ स्वयंसेवकांची नियुक्ती
– १ एप्रिलपासून जकात रद्द होण्याची शक्यता
– जीएसटीमुळे पालिकेचे उत्पन्न घटण्याची शक्यता, इतर कर वाढविण्याबाबत विचार होणार
– घनकचऱयासाठी मुंबईबाहेर तळोज्याजवळ १२६ एकर जमिन संपादित
– आयटीसाठी ७५ कोटींची तरतूद
– राईट टू पी या महिलांसाठी शौचालयांच्या योजनेसाठी ५.२५ कोटी रुपयांची तरतूद
– पालिका इमारत दुरुस्ती व पुर्नबांधणीसाठी ५६० कोटी रूपये
– स्मशानभूमी सीएनजी कनेक्शनसाठी ४ हजार कोटींची तरतूद
– २०० शाळांमध्ये संगणकीय लॅब
– आठवीच्या विद्यार्थ्यांना टॅब उपलब्ध करून देणार
– २९ कोटी रूपये प्राथमिक शिक्षण सुधार कार्यक्रमांतर्गत
– पुढील ५ वर्षात २६ नवीन अग्निशमन केंद्रे बांधण्यासाठी २ कोटींची तरतूद
– अंधेरीतील शहाजी राजे क्रीडा संकुलातील प्रस्तावित नाट्यगृहांसाठी २५ लाखांची तरतूद