पालिकेतील स्थायी समिती व शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी निवडणुका होत आहेत. स्थायी समितीचे अध्यक्षपद सलग दुसऱ्या वर्षी सेनेच्या यशोधर फणसे यांच्याकडेच राहण्याची शक्यता असून शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या रितू तावडे यांची निवड पक्की समजली जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी वकारुन्निसा अन्सारी तर शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी विन्नी डिसोजा यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. ८ एप्रिल रोजी होत असलेल्या सुधार समितीच्या अध्यक्षपदासाठी सत्ताधाऱ्यांकडून प्रकाश गंगाधरे यांचे नाव पुढे आहे. बेस्टच्या अध्यक्षपदाची सेनेच्या अरविंद दुधवडकरांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.