News Flash

रस्ता रुंदीकरणासाठी आठ झाडांची कत्तल

परळ गावात महापालिकेच्या कृत्यावर नाराजी

परळ गावात महापालिकेच्या कृत्यावर नाराजी

मुंबई : परळ गावातील ग. दं. आंबेकर मार्गावरील पूर्ण वाढलेली आठ झाडे गुरुवारी पालिके ने कापल्यामुळे या विभागातील रहिवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. रस्त्याच्या रुंदीकरणाआड येत असल्यामुळे ही झाडे तोडल्याचे पालिके चे म्हणणे आहे. मात्र ही झाडे तेथील एका विकासकाच्या फायद्यासाठी तोडली जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी के ला आहे. आरेमधील वृक्ष वाचविण्यासाठी रान उठवणाऱ्या शिवसेनेच्या बालेकि ल्ल्यातच एकाच वेळी आठ झाडे तोडल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

परळ गावातील ग. दं. आंबेकर मार्गावरील तब्बल आठ झाडे पालिके च्या एफ दक्षिण विभागाने गुरुवारी कापली. पूर्ण वाढ झालेली झाडे कापल्यामुळे हा रस्ता भकास दिसू लागला आहेच, पण भर उन्हाळ्यातील सावली आणि हिरवाई गेल्यामुळे रहिवाशांनी नाराजी व्यक्त के ली आहे. नुकतेच या ठिकाणी एका विकासकाचा प्रकल्प पूर्ण झाला असून त्याच्या सोयीसाठी ही झाडे कापली जात असल्याचा संशय काही रहिवाशांनी व्यक्त के ला आहे. रहिवाशांनी पालिके च्या विभागीय कार्यालयात दूरध्वनी करून याबाबत तक्रारीही के ल्या. आरेमध्ये वृक्षतोड करू नये म्हणून तेथे मेट्रो कारशेड उभारण्यास विरोध करणाऱ्या शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परळ गावात रस्ता रुंदीकरणासाठी झाडे कापल्यामुळे रहिवाशांनी आश्चर्य व्यक्त के ले आहे.

मुंबईत कोणत्याही विकासकामाच्या आड झाडे येत असल्यास जास्तीत जास्त झाडे वाचवण्याचा प्रयत्न वृक्ष प्राधिकरणाद्वारे के ला जातो. जास्तीत जास्त झाडे पुनरेपित करण्यात येतात. तर कमीत कमी झाडे तोडली जातात. मात्र याठिकाणी ८ झाडे कापली असून के वळ एक झाड पुनरेपित के ले जाणार आहे.

प्रक्रिया पारदर्शक

आंबेकर मार्गाच्या रुं दीकरणाच्या कामासाठी ही झाडे तोडली असल्याची माहिती एफ दक्षिण विभागाच्या उद्यान खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. ही झाडे तोडण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण के ली असून वृक्ष प्राधिकरणाच्या परवानगीनेच ही झाडे कापली असल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हा रस्ता अरुंद असल्यामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे जसजसे पुनर्विकास प्रकल्प होतात तसे तसे रस्ता रुंदीकरणाची कामे टप्प्याटप्प्याने के ली जात आहेत. या ठिकाणी एक प्रकल्प पूर्ण झाला असून विकासकाने पालिके ला अतिरिक्त जागा (सेट बॅक) हस्तांतरित के ली आहे. त्यामुळे आम्ही रीतसर सार्वजनिक सूचना देऊन, हरकती व सूचना मागवल्या होत्या व त्यानंतर सुनावणी घेऊन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण के ली आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 1:01 am

Web Title: bmc cut down eight trees for road widening in parel zws 70
Next Stories
1 जुलै-ऑगस्टमध्ये तिसरी लाट येण्याची भीती
2 लसीकरण तीन दिवस बंद
3 मुंबईच्या आर्द्रतेत वाढ
Just Now!
X