मुंबई महापालिकेच्या प्रस्तावित प्रारूप विकास नियोजन आराखडा २०१४ – २०३४ बाबत प्रारुप विकास नियंत्रण नियमावलीतील भाग १ व २ तयार करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रारुप विकास नियोजन आराखडय़ासंबंधी विविध व्याख्या, संबंधितांचे अधिकार व कार्यकक्षा यांचा समावेश आहे. हे दोन्ही भाग सर्वपक्षीय गटनेत्यांच्या सभेत सादर करण्यात आले होते. त्यानंतर आता सदर प्रारुप महापालिकेच्या http://www.mcgm.gov.in या संकेत स्थळावर ११ मार्च पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबत संबंधितांनी त्यांची निरीक्षणे २५ मार्चपर्यंत नोंदवावीत, असे आवाहन महापालिकेद्वारे करण्यात आले. महापालिकेच्या सुधारित प्रारुप विकास नियंत्रण नियमावलीमध्ये एकूण १२ भाग व जोडपत्रे प्रस्तावित आहेत.