News Flash

मुंबई महानगरपालिकेच्या जागतिक निविदेअंतर्गत लस खरेदीसाठी ३ प्रस्ताव!

६० ते ९० दिवसांच्या आता लसीकरण करण्याचं लक्ष्य

रशियन स्पुटनिक व्ही लस

मुंबईत करोना लसीकरणाचा वेग गेल्या काही दिवसात मंदावला आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध नसल्याने मुंबईत काही ठिकाणी लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. लसीकरणाचा तुटवडा पाहता मुंबई महापालिकेनं १ कोटी लशींची जागतिक निविदा काढली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परवानगीनंतर ही निविदा काढण्यात आली होती. मात्र निविदा काढल्यानंतर कुणीच रुची न दाखवल्याने कालावधी वाढवण्यात आला होता. आता मुंबईत करोना लशींचा पुरवठा करण्यासाठी रशियाची वैज्ञानिक संस्था असलेल्या आरडीआयएफकडून प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. एनडीटीव्ही इंडियानं याबाबतच वृत्त दिलं आहे.

मुंबई महानगरपालिकेनं ११ मे रोजी निविदा काढली होती. निविदेची तारीख २५ मे रोजी संपणार आहे. मात्र तत्पूर्वी तीन प्रस्ताव आले आहेत. यापैकी एक प्रस्ताव थेट रशियन डायरेक्टर इनव्हेस्टमेंट फंडकडून आला आहे. तर दोन प्रस्ताव इतर खासगी कंपन्यांकडून आले आहेत. तिन्ही कंपन्यांनी रशियाच्या स्टुटनिक व्ही लसीचा पुरवठा करण्याची तयारी दाखवली आहे.

परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलं अटकेपासून संरक्षण!

रशियातील स्पुटनिक व्ही लशीला देशात परवानगी मिळाली आहे. त्यानंतर लसीकरणही सुरु झालं आहे. मुंबई महापालिका लस खरेदीवर ३०० ते ७०० कोटी रुपये खर्च करणार आहे. मुंबई महानगरपालिकेचं ६० ते ९० दिवसांच्या आता लसीकरण करण्याचं लक्ष्य आहे.

“महाविकासआघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात!”

दुसरीकडे पंजाब आणि दिल्ली सरकारने काढलेल्या निविदेला खासगी कंपन्यांनी पाठ दाखवली आहे. रशियामधून पहिला साठा हा १ मे रोजी भरतात दाखल झाला. स्थानिक औषध प्रशासनाने त्याला १३ मे रोजी मान्यता दिली. पुढील काही महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्यात या लसीचा साठा पाठवला जाईल. त्यादरम्यान दुसरीकडे भारतीय कंपन्यांच्या माध्यमातूनही या लसींची निर्मिती केली जाणार आहे. अनेक संशोधनांमध्ये ही लस ९० टक्के परिणामकारक असल्याचं दिसून आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2021 5:51 pm

Web Title: bmc gets 3 bids for corona global vaccine tender rmt 84
टॅग : Bmc,Corona
Next Stories
1 परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलं अटकेपासून संरक्षण!
2 राज्यपालांना विमानातून उतरवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी राज्यघटना शिकवू नये – अतुल भातखळकर
3 मुंबईत आमदाराच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न
Just Now!
X