News Flash

प्रशांत दामले यांचा मंगळवारी सत्कार

विक्रमवीर अभिनेता व निर्माता प्रशांत दामले यांचा मुंबई महानगरपालिकेतर्फे नुकताच नागरी सत्कार करण्यात आला. ‘गेला माधव कुणीकडे’ नाटकाचे विक्रमी १०७०० प्रयोग केल्याबद्दल आणि रंगभूमीवरील योगदानाबद्दल

| March 17, 2013 01:27 am

विक्रमवीर अभिनेता व निर्माता प्रशांत दामले यांचा मुंबई महानगरपालिकेतर्फे नुकताच नागरी सत्कार करण्यात आला. ‘गेला माधव कुणीकडे’ नाटकाचे विक्रमी १०७०० प्रयोग केल्याबद्दल आणि रंगभूमीवरील योगदानाबद्दल श्री षण्मुखानंद फाईन आर्ट्स आणि संगीत सभा या संस्थेच्या वतीने प्रशांत दामले यांचा मंगळवार, १९ मार्च रोजी सत्कार केला जाणार आहे. श्री षण्मुखानंद फाईन आर्ट्स आणि संगीत सभा या संस्थेचे हीरकमहोत्सवी वर्ष सुरू असून त्यानिमित्त १९ मार्चपासून आठ दिवसांचा नाटय़ महोत्सव आयोजित करण्यात आला असून पहिल्या दिवशी प्रशांत दामले यांच्या सत्कारानंतर त्यांच्या ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचा सायंकाळी ७ वाजता प्रयोग श्री षण्मुखानंद चंद्रशेखरन्द्र सरस्वती सभागृहात होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 1:27 am

Web Title: bmc honored prashant damle on tuesday
टॅग : Bmc,Prashant Damle
Next Stories
1 ‘एलबीटी’ला विरोध
2 ‘इंडियाबुल्स’वरून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारला जाब!
3 व्यावसायिकाच्या मुलाला पळवणारे दोन तासांत गजाआड
Just Now!
X