28 February 2021

News Flash

मुंबईकरच गटाराची झाकणं उघडी ठेवतात, महापौरांनी लोकांवरच फोडलं खापर

'पालिकेकडून वारंवार विनंती करुनही लोक कचरा टाकण्यासाठी गटारावरील झाकणं तोडतात'

गोरेगावमध्ये दीड वर्षांचा चिमुरडा नाल्यात पडून वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात टीका होत असून लोक संताप व्यक्त करत आहेत. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घटनास्थळी भेट दिली असता त्यांनाही लोकांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. दरम्यान, महापौरांनी या घटनेसाठी मुंबईकरांनाच जबाबदर ठरवलं असून, मुंबईकरच गटारांची झाकणं उघडी ठेवतात असं म्हटलं आहे.

अनेक ठिकाणी स्थानिक लोक गटारांवरील झाकणं काढत असल्याचं सांगत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी गोरेगावच्या घटनेचं खापर मुंबईकरांवरच फोडलं आहे. दरम्यान याप्रकरणी त्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गटार स्थानकांनी तोडल होतं की प्रशासनानेच झाकण बसवलं नव्हतं हे पाहणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

गोरेगावात चिमुरडा नाल्यात पडला; पालिकेविरोधात स्थानिकांचा रास्तारोको

यावेळी पुढे बोलताना त्यांनी पालिकेकडून वारंवार विनंती करुनही लोक कचरा टाकण्यासाठी गटारावरील झाकणं तोडतात असं सांगितलं असून मुंबईकरांना सिव्हिक सेन्स नसल्याची टीका केली आहे.

घराबाहेरील उघड्या नाल्यात पडल्याने एक तीन वर्षाचा चिमुकला वाहून गेल्याची घटना गोरेगाव येथे घडली आहे. बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून बचाव पथक या चिमुकल्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून याला पालिकाच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकर नगरमधील रहिवाशांनी रास्तारोको करत आपला संताप व्यक्त केला.

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे आज आंबेडकर नगरमध्ये येण्यापूर्वी येथील रहिवाशांनी रास्तारोको करत आपला संताप व्यक्त केला. तसेच चिमुकला वाहून जाण्याच्या घटनेला मुंबई महानगरपालिकाच जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला. गोरेगावच्या आंबेडकरनगर येथे ही घटना घडली असून काल येथे मुसळधार पाऊस सुरु होता. त्यातच या चिमुकल्याच्या घराबाहेरील नाला उघडा होता. त्यातून पावसाचे पाणी मोठ्या प्रवाहाने वाहत होते. दरम्यान, आपण त्या मुलाच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. तसेच जे अधिकारी या घटनेत दोषी सापडतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन महापौरांनी यावेळी दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2019 6:09 pm

Web Title: bmc mayor vishwanath mahadeshwar on goregaon child fall into sewer drain sgy 87
Next Stories
1 शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा बुधवारी पिकविमा कंपन्यांविरोधात मोर्चा
2 मुंबईतील कर्नाटकाचे बंडखोर आमदार बंगळुरूला रवाना
3 धक्कादायक! वडिलांनी ‘लोडेड रिव्हॉल्वर’ दिली चिमुकल्याच्या हाती
Just Now!
X