महागाईमुळे संकटात सापडलेल्या मुंबईकरांना महानगरपालिकेने पाणीपट्टीत वाढ करून आणखी एक धक्का दिला आहे. मुंबईतील पाणीपट्टीत ३.७२ टक्के वाढ करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने आज घेतला असून ही पाणीपट्टी वाढ सरसकट सगळ्यांसाठीच असणार आहे. येत्या १६ जूनपासून ही दरवाढ लागू होणार आहे. सध्या घरगुती वापराच्या पाण्यासाठी प्रतिहजार लिटर मागे ४.९१ रुपये जलआकार आहे. तो वाढून ५.०९ रुपयांवर जाणार आहे.

पाणीपट्टीत ३.७२ टक्के वाढ झाल्यानंतर झोपडपट्टीतील पाणीदरात प्रती हजार लिटर्सचा दर ४.०८ रुपयांवरून ४.२३ रुपये होणार आहे. व्यावसायिक दरात ३६.८८ रुपयांवरून ३८.२५ रुपये वाढ होणार आहे. त्यावर ७० टक्के मलनि:सारण शुल्कही आकारले जाणार आहे.

पाणीपट्टीचे नवे दर (प्रतिहजार लिटरमागे)

बिगर व्यावसायिक संस्था
सध्या- १९.६७ रुपये, वाढीनंतर – २०.४० रुपये

शीतपेय, बाटलीबंद पाणी
सध्या – १०२.४४ रुपये, वाढीनंतर -१०६.२५ रुपये

व्यावसायिक संस्था
सध्या – ३६.८८ रुपये, वाढीनंतर – ३८.२५ रुपये

उद्योग, कारखाने
सध्या – ४९.१६ रुपये, वाढीनंतर – ५०.९९ रुपये

थ्री स्टारहून अधिक स्टार हॉटेल्स आणि रेसकोर्स
सध्या – ७३.७५ रुपये, वाढीनंतर – ७६.४९ रुपये