30 September 2020

News Flash

सुश्मिता सेनला पालिकेची नोटीस

सुश्मिता सेनवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.

अभिनेता शाहीद कपूरपाठोपाठ प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेन हिच्या खार येथील घरामध्ये तीन ठिकाणी डासांची उत्पत्तीस्थाने सापडल्याने पालिकेने तिला नोटीस बजावली आहे. सुश्मिता सेनवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.

खार येथील आंबेडकर रोडवरील सुद्गुरू सुंदरी को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील सहाव्या मजल्यावर सुश्मिता सेन राहते. या इमारतीमध्ये पालिकेतर्फे डासांच्या उत्पत्तीस्थानांची तपासणी करण्यात येत होती, मात्र तब्बल आठ दिवस सुश्मिता सेन यांनी विविध कारणे पुढे करीत आपल्या घरात डास शोधकांना प्रवेश नाकारला होता. गेल्या शुक्रवारी अखेर डास शोधकांनी तिच्या घराची पाहणी केली. या पाहणीदरम्यान तीन ठिकाणी डासांची उत्पत्तीस्थाने आढळून आली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ ही उत्पत्तीस्थाने नष्ट केली. सुश्मिता सेन यांना पालिकेने कलम ३८१ ब अन्वये नोटीस बजावली आहे. त्यामुळे लवकरच तिच्यावर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2016 2:19 am

Web Title: bmc notice to sushmita sen
Next Stories
1 चार रुपयांमुळे दोन कोटींच्या सोनेचोरीची उकल
2 जीपीएस प्रणाली सक्षम करण्यासाठी ‘प्रथम’ प्रयोग
3 हतबलता की मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न?
Just Now!
X