24 September 2020

News Flash

मुंबई महापालिकेच्या लाचखोर जकात अधिकाऱ्यास अटक

जकातीची भलामण करण्यात व्यापारी, वाहतूकदार आणि जकात दलालांचा एक मोठा गट सध्या सक्रिय झाल्याची चर्चा सुरू असतानाच मुंबई महापालिकेच्या जकात विभागातील दक्षता पथकाचे

| June 19, 2014 12:06 pm

जकातीची भलामण करण्यात व्यापारी, वाहतूकदार आणि जकात दलालांचा एक मोठा गट सध्या सक्रिय झाल्याची चर्चा सुरू असतानाच मुंबई महापालिकेच्या जकात विभागातील दक्षता पथकाचे वरिष्ठ अधिकारी सुनील बळीराम बने यांना जकात चोरीला जीवदान देण्यासाठी सुमारे तीन लाख रुपयांची लाच घेताना ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रात्री अटक केल्याने जकात चोरी करणारे अधिकारी व दलालांच्या अभद्र युतीचा कारभार पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे.
या प्रकरणात तक्रारदार हे व्यवसायाने जकात दलाल आहेत. त्यांच्यामार्फत येणाऱ्या वाहतूकदारांच्या वाहनांवर कारवाई करू नये यासाठी अधिकारी सुनील बने याने तीन लाखांची लाच मागितली होती. या प्रकरणी संबंधित जकात दलालाने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार या विभागाच्या पथकाने कॅसलमिल नाका परिसरात सापळा रचून बने याला जकात दलालाकडून तीन लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
बने याने यापूर्वीही लाच घेतली असावी, असा संशय अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे त्याने ज्या कोणाकडून कामाच्या मोबदल्यात पैसे घेतले असतील तसेच त्याच्या मालमत्तेविषयी माहिती असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत विभागाने केले आहे.
भिवंडीत वकिलास अटक
भिवंडी न्यायालयात गुन्ह्य़ाचे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर तो खटला अधिक बळकट करणे आणि न्याय मिळवून देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना सरकारी वकील किरण बळवंत काकडे (५०) याला बुधवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून कोनगाव पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्य़ाचे आरोपपत्र भिवंडी येथील न्यायालयात दाखल झाले होते. याच खटल्यासंदर्भात किरण काकडे याने एक हजारांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, या विभागाच्या पथकाने किरणला रंगेहाथ पकडले.

लखपती बने..
सुनील बने आणि त्याच्या पत्नीच्या नावे मुलुंड तसेच गोरेगाव लिंकरोड येथे दोन फ्लॅट आहेत. कणकवली येथे २३ गुंठे जागा खरेदीखत आहे. याखेरीज आठ लाखांची रोख रक्कम, ७.३० ग्रॅम सोने, कॅनरा बँकेत ८० हजारांचे फिक्स डिपॉझिट, दोन मुलींच्या नावे वेगवेगळ्या बँकेमध्ये सुमारे ५ लाख ५९ हजारांचे फिक्स डिपॉझिट आणि त्यांच्या नावे सात लाख ५५ हजार रुपयांच्या एलआयसीच्या पावत्या आहेत. तसेच त्यांच्या नावावर होंडासिटी, इनोव्हा, स्कुटी आदी वाहनांच्या खरेदीची कागदपत्रेही मिळून आली आहेत, अशी माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2014 12:06 pm

Web Title: bmc officer held for taking rs 3 lakh bribe from octroi agent
टॅग Bribe
Next Stories
1 मेट्रो रेल्वेतून फिरा अवघ्या पाच रुपयांत
2 पनवेल-ठाणे लोकलमधील हत्या चोरीच्या उद्देशाने
3 ताबा सुटलेल्या इनोव्हा गाडीखाली वृद्ध महिला ठार
Just Now!
X