काळबादेवी दुर्घटना ते कुर्ला येथील ‘सिटी किनारा’ हॉटेलला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर पालिका आयुक्तांनी संपूर्ण मुंबईत हॉटेल, फेरीवाले, अनधिकृत बांधकामे आदींविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्यापाठोपाठ पालिका आयुक्त अजय मेहता यांनी आता तब्बल १४ साहाय्यक आयुक्तांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. भाग्यश्री कापसे, केशव उबाळे, शरद उघाडे, संगीता सहनाळे आदींचा त्यात समावेश आहे.

के-पूर्व विभागातील साहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांची जी-दक्षिण विभाग कार्यालयात, केशव उबाळे यांची जी-दक्षिणमधून एफ-उत्तरमध्ये, अलका ससाणे यांची एफ-उत्तरमधून नियोजन विभागात, शरद उघाडे यांची जी-उत्तरमधून एच-पश्चिममध्ये, विजय कांबळे यांची एम-पश्चिममधून आर-उत्तरमध्ये बदली करण्यात आली आहे.