News Flash

पालिका अधिकाऱ्यांना पदोन्नती, पदावनतीही

मुंबई महापालिकेत बुधवारी काही अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली तर काहींची पदावनती करण्यात आली. गेली अनेक वर्षे प्रमुख लेखापाल (वित्त) या पदावर कार्यरत असलेले राम धस

| May 22, 2014 04:25 am

मुंबई महापालिकेत बुधवारी काही अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली तर काहींची पदावनती करण्यात आली. गेली अनेक वर्षे प्रमुख लेखापाल (वित्त) या पदावर कार्यरत असलेले राम धस यांना उपायुक्त- ३ पदी पदोन्नती देण्यात आली.
धस यांना पदावरून हटविण्यासाठी शिवसेना-भाजप युतीने आक्रमक भूमिका घेतली होती. परंतु पालिका आयुक्त त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याने त्यांची बदली होऊ शकली नाही. मात्र, आता राम धस यांना पदोन्नती देण्यात आली आहे. हंगामी उपायुक्त ए. एल. वागराळकर यांची उपायुक्त-२ पदी, कार्यकारी अभियंता एस. पी. कालपे यांची सहाय्यक आयुक्तपदी (बी) पदोन्नती, तर हंगामी उपायुक्त रमेश पवार यांची सहाय्यक आयुक्त (बाजार), उपायुक्त सुनील धामणे यांना हंगामी उपायुक्तपदी, तसेच प्रमुख लेखापाल एच. एस. निकम यांची लेखापालपदी (वित्त) पदावनतीोाली आहे. सहाय्यक आयुक्त राजेश काटकर यांची सहाय्यक आयुक्त (अतिक्रमण), सहाय्यक आयुक्त विजयानंद बोले यांची सहाय्यक आयुक्तपदी (अतिक्रमण)ी वर्णी लागली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 4:25 am

Web Title: bmc officials promotion and demotion
टॅग : Bmc
Next Stories
1 तुर्भेजवळ रेल्वेरुळाला तडा
2 ‘हाफकिन’ची वाताहत
3 डॉ. मेहरु बेंगाली यांचे निधन
Just Now!
X