News Flash

१०४ टक्के नालेसफाई! मुंबई महापालिके चा दावा

मोठय़ा नाल्यांमधून पावसाळापूर्व उद्दिष्टाच्या तुलनेत अधिक म्हणजे १०४ टक्के गाळ उपसा करण्यात आला आहे,

संग्रहीत

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही नालेसफाई झालेली नसल्याचा दावा विरोधकांनी के लेला असला तरीही मुंबईतील मोठय़ा नाल्यांतील १०४ टक्के  गाळ उपसला असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मोठय़ा नाल्यांमधून पावसाळापूर्व उद्दिष्टाच्या तुलनेत अधिक म्हणजे १०४ टक्के गाळ उपसा करण्यात आला आहे, असे पालिके चे म्हणणे आहे.

महानगरपालिकेच्या पर्जन्य जल वाहिन्या विभागाच्या माध्यमातून दरवर्षी मुंबई महानगरातील मोठय़ा नाल्यांची स्वच्छता करण्यात येते. पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करताना किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून दरवर्षी उद्दिष्ट निश्चित केले जाते. मुंबई महानगरातील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्यांमधून गाळ काढण्याबाबतचे उद्दिष्ट ठरविले जाते. या आधारावर यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत ३५ टक्के अधिक गाळ काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. ते महानगरपालिकेने यशस्वीपणे पूर्ण केले असल्याचा दावा पालिका प्रशासनाने के ला आहे.

मुंबईत दरवर्षी पावसाळ्याच्या आधी नाल्यांतून ७५ टक्के गाळ उपसा के ला जातो, १० टक्के गाळ उपसा पावसाळ्यात तर १५ टक्के गाळ उपसा पावसाळ्यानंतर के ला जातो. पावसाळ्याआधीचा ७५ टक्के गाळ उपसा करण्याचे काम मे महिन्याअखेरीस पूर्ण झाले असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. पावसाळ्यापूर्वी एकूण ३ लाख ११ हजार ३८१ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट महानगरपालिकेने यंदा समोर ठेवले होते. त्या तुलनेत ३ लाख २४ हजार २८४ मेट्रिक टन इतका गाळ काढून १९ हजार ९३ इतक्या वाहनफे ऱ्यांद्वारे तो वाहून नेण्यात आला आहे, असे पर्जन्यजल वाहिन्या विभागाचे म्हणणे आहे.  इतकेच नाही तर  जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात १७ हजार २९७ मेट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे.

नालेसफाई नसून हातसफाई असल्याचा आरोप आमदार आशिष शेलार यांनी या पूर्वी के ला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 3:47 am

Web Title: bmc over nullah cleaning bmc claim 100 percent drains cleaning zws 70
Next Stories
1 बोगस डॉक्टरला अटक
2 मुंबई-दिल्ली वेगवान प्रवास दोन वर्षांनी
3 खासगी रुग्णालयांसाठी लशीचे कमाल दर निश्चित
Just Now!
X