28 February 2021

News Flash

मुंबईतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

शाळा आणि महाविद्यालयात जाताना विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे हाल होऊ नयेत या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत मागच्या ४८ तासांहून अधिक काळ पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे वाहतूक आणि सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. ही स्थिती लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने सर्व शाळा व महाविद्यालयांना आजच्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना शाळा तसेच महाविद्यालयात पाठवू नये.

शाळा आणि महाविद्यालयात जाताना विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे हाल होऊ नयेत या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत पाऊस कोसळत असल्याने सर्वच ठिकाणच्या रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. लोकल धिम्या गतीने धावत आहेत तर रस्त्यांवरही पाणी साचले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शक्यतो घराबाहेर पडू नये असे आवाहनही करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 6:15 am

Web Title: bmc schools and colleges closed due to heavy rain mpg 94
Next Stories
1 पावसाची झोडपणी सुरूच
2 मध्य रेल्वेच्या अर्धवट कामांचा फटका
3 कुल्र्यात चार महिन्यांत ३०४ काविळीचे रुग्ण
Just Now!
X