२९ मॉलना पाच महिन्यांपूर्वीच पालिके ची नोटीस

मुंबई :  मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला ऑक्टोबर महिन्यात लागलेल्या भीषण आगीनंतर पालिकेकडून मुंबईतील सर्व ७५ मॉलमधील अग्निसुरक्षेची तपासणी करण्यात आली होती. त्या वेळी ज्या मॉलमध्ये अग्निसुरक्षेची यंत्रणा नव्हती किं वा अग्निप्रतिबंधक नियमांचे पालन के लेले नव्हते अशा २९ मॉलना नोटीस बजावण्यात आली होती. त्यात भांडुपच्या ड्रीम्स मॉलवरही नोटीस बजावण्यात आली होती.

मुंबई सेंट्रल सिटी सेंटर मॉलला लागलेली आग नियंत्रणात येण्यास तब्बल ५६ तास लागले होते. त्या वेळी मॉलमधील अग्निसुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला होता. सर्व मॉलमधील अग्निसुरक्षेची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालिकेने दिले होते. त्यानंतर पालिके ने सर्व मॉलची तपासणी के ली असता २९ मॉलमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणेत त्रुटी असल्याचे आढळून आले. त्यामुळे या मॉलना अग्निप्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या.

या मॉलमध्ये किती त्रुटी आहेत त्यानुसार उपाययोजना करण्यासाठी कालावधी मॉलना दिलेला होता. हा कालावधी प्रत्येक मॉलसाठी वेगवेगळा आहे. या उपाययोजना करून मॉलने अग्निशमन दलाला कळवणे अपेक्षित आहे.