महानगरपालिका आरोग्य सेवेच्या इतिहासात पहिल्यांदाच मध्यमवर्गासाठी रुग्णालयातील दहा टक्के राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. तब्बल तेरा वर्षांनी पुन्हा कार्यान्वित होत असलेल्या कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात ३० खाटा मध्यमवर्गासाठी असून परिसरातील नर्सिग होमप्रमाणे सेवाशुल्क आकारले जाईल.
शताब्दी रुग्णालयात सशुल्क सेवा घेणाऱ्या रुग्णासाठी वेगळी खोली व दोन रुग्णांसाठी एक सामायिक प्रसाधनगृह अशी सुविधा देण्यात आली आहे. ‘पालिका रुग्णालयातील गदीमुळे मध्यमवर्गीय या रुग्णालयांपासून दूर गेला आहे. त्याचवेळी शहरातील पंचतारांकित रुग्णालयातील सेवाशुल्कही त्याला परवडत नाही. अशा वेळी परिसरातील नर्सिग होमप्रमाणेच शुल्क आकारून पालिका रुग्णालयातील निष्णात डॉक्टरांची सेवा करदात्या मध्यमवर्गाला देण्यासाठी सशुल्क खाटांची संकल्पना राबवण्यात येत आहे,’ अशी माहिती अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर-पाटणकर यांनी दिली.
ऑक्टोबरमध्ये सुरू होत असलेले जोगेश्वरी येथील आजगावकर ट्रॉमा केअर रुग्णालय व डिसेंबरमध्ये सुरू होणारे कूपर रुग्णालय येथेही दहा टक्के जागा सशुल्क उपलब्ध करून देण्यात येतील.
डॉ. आंबेडकर रुग्णालय सज्ज!
दोन सप्टेंबर रोजी सुरू होत असलेल्या शताब्दीचे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय’ असे नामकरण करण्यात येणार आहे. या रुग्णालयात ३२४ खाटा असून त्यात ३० खाटा वृद्धांसाठी, दहा खाटा कॅन्सर रुग्णांच्या केमोथेरपीसाठी ठेवल्या आहेत. डायलिसिससाठी आठ खाटा राखून ठेवण्यात आल्या असून वैद्यकीय अतिदक्षता, शस्त्रक्रिया अतिदक्षता व शिशु अतिदक्षता विभागासाठी प्रत्येकी दहा खाटा आहेत. रुग्णालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या ९४ डॉक्टरांच्या पदांपैकी ४१ पदे भरली आहेत. परिचारिका कंत्राटी असून साफसफाईची कंत्राटही खाजगी संस्थेला देण्यात आले आहे.

कुठे गेले ते बंदसम्राट?
एरवी लहान-सहान प्रश्नांवर बंदचे हत्यार उगारून ठाणेकरांना वेठीस धरणाऱ्या ठाण्यातील सर्वच राजकीय पक्षांनी या मारहाणीबद्दल साधा निषेधही नोंदविलेला नाही. त्यामुळे दहीहंडी उत्सवातील दणदणाटाचे समर्थन करत धटिंगणपणा करणाऱ्या राजकीय नेत्यांना खाकी वर्दीचा असलेला छुपा पाठिंबा पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.