प्रकल्पातून माघार घेण्यासाठी दबाव आणल्याची तक्रार

मुंबई : स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपल्या प्रभागात कंत्राटदाराला फोनवरून धमकावल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले. ई निविदेच्या माध्यमातून मिळालेल्या कामातून माघार घेण्यासाठी फोनवरून कंत्राटदाराला धमकावल्याची त्यांची ध्वनिफीत जाहीर झाली आहे. जाधव यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली आहे.

भायखळा येथील पालिकेच्या ई विभागातील प्रभाग क्र. २०९ मध्ये मे. यश कॉर्पोरेशन यांच्या कंपनीने ई निविदेअंतर्गत १४ कामे मिळवली आहेत. या प्रभागात जाधव नगरसेवक आहेत तर त्यांच्या पत्नी यामिनी जाधव येथील आमदार आहेत. यशवंत जाधव यांनी कंत्राटदाराला फोन करून या कामातून माघार घेण्याबाबत दबाव आणल्याची तक्रोर आहे. या ठिकाणी काम कसे भरले? हा प्रभाग कोणाचा आहे हे तुला माहीत आहे का? अशी विचारणा जाधव करीत असल्याचे त्यात ऐकू  येत आहे.

कंत्राटदाराने पालिका आयुक्त आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीत माझ्या जीवितास काही इजा किंवा धोका झाल्यास त्याला जाधव जबाबदार असतील, असेही

कंत्राटदाराने म्हटले आहे. अंदाजित रकमेपेक्षा कमी बोली लावणाऱ्या

कंत्राटदारांना धमकावून, त्यांना माघार घ्यायला लावून नंतर स्वत:च्या मर्जीतील कंत्राटदाराला कं त्राट दिले जाते, असा आरोप या कंत्राटदाराने केला आहे. कंत्राटदाराने आपली बाजू मांडणारी एक ध्वनिचित्रफीत जाहीर के ली आहे.

भाजपकडून राजीनाम्याची मागणी

नैतिक जबाबदारी स्वीकारून जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी के ली आहे.

 

कंत्राटदाराची भाषा टक्केवारीची -जाधव

यशवंत जाधव यांनी या ध्वनिफितीतील आवाज आपला असल्याचे मान्य के ले आहे. मात्र या कं त्राटदाराने माझ्याशी टक्के वारीची भाषा वापरली होती जी या ध्वनिफितीत नाही, असा आरोप जाधव यांनी के ला आहे. मी कंत्राटदाराला धमकावले नाही तर माझी बोलण्याची हीच पद्धत आहे, असेही जाधव यांनी म्हटले आहे. या कंत्राटदाराने आतापर्यंत  केवळ मुलुंड टी विभागात काम के ले होते व ते योग्य प्रकारे झाले नव्हते. माझ्या विभागात चांगले काम व्हावे असे मला वाटते म्हणून मी त्यांना भेटायला बोलावले होते, असेही जाधव यांनी म्हटले आहे.