04 June 2020

News Flash

मैदाने ताब्यात घेण्यासाठी पालिकेची प्रक्रिया सुरू

कंपन्या आदींना पालिकेची मैदाने दत्तक देण्याबाबतच्या धोरणास देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ३० संस्था, संघटनांना आज नोटीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देताच पालिकेने काळजीवाहू तत्त्वावर खासगी संस्था, संघटनांना दिलेले भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यापैकी ३० संस्थांवर मंगळवारी पालिकेकडून नोटीस बजावण्यात येणार आहे.
खासगी संस्था, संघटना, कंपन्या आदींना पालिकेची मैदाने दत्तक देण्याबाबतच्या धोरणास देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली. त्याचबरोबर यापूर्वी संस्था, संघटनांना दिलेले पालिकेचे २३५ भूखंड ताब्यात घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पालिकेने पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे ३० भूखंड खासगी संस्थांकडून परत घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या संस्था, संघटनांवर मंगळवारी नोटीस बजावणार असून त्याबाबतच्या फाईलवर पालिका आयुक्त अजय मेहता यांनी सोमवारी सायंकाळी स्वाक्षरी केली.
मैदानाची योग्य प्रकारे देखभाल न करणे, मैदानांचा गैरवापर करणे, अटी-शर्तीचा भंग केलेल्या संस्था, संघटनांचा या ३० जणांमध्ये समावेश आहे, असे पालिका अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

दत्तक विधान मोडीत काढून मैदानांची देखभाल पालिकेने करावी -काँग्रेस
मुंबई : सत्ताधारी शिवसेना-भाजपने पालिका सभागृहात मंजूर केलेले मैदानांचे दत्तक विधान मोडीत काढावे आणि सर्व मैदाने पालिकेने ताब्यात घेऊन त्यांची देखभाल करावी, अशी मागणी काँग्रेसकडून सोमवारी करण्यात आली. मुंबईकरांची मैदाने केवळ धनदांडग्यांसाठी दिली गेली तर वेळप्रसंगी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशाराही काँग्रेसकडून देण्यात आला आहे.
मुंबई महापलिका देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असून मुंबईतील १०६८ मैदानांच्या देखभालीसाठी वर्षांकाठी केवळ १०६ कोटी रुपयांची गरज आहे. ३३.५० हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या पालिकेला १०६ कोटी रुपये जड नाहीत. त्यामुळे मैदानांचे दत्तक विधान रद्द करावे, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2016 5:42 am

Web Title: bmc started the process to take ground from private institutions
टॅग Bmc
Next Stories
1 मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार!
2 रमेश वळंजू यांच्या कुटुंबीयांना सारस्वत बँकेचा आधार
3 १० नगरसेवकांचे पद धोक्यात
Just Now!
X