अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींचे लसीकरण १ ऑगस्टपासून

मुंबई : दीर्घ आजारपणामुळे किंवा वैद्यकीय कारणांमुळे ज्या व्यक्ती अंथरुणाला खिळून आहेत, अशा व्यक्तींना घरी जाऊन करोनाची लस देता यावी याकरिता पालिकेने तयारी सुरू केली असली तरी पालिका प्रशासनाला राज्य सरकारच्या नियमावलीची प्रतीक्षा आहे. येत्या एक-दोन दिवसांत ही नियमावली जाहीर होण्याची शक्यता असून त्यानंतर १ ऑगस्टपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे.

ज्या नागरिकांना जागेवरून हलता येत नाही किंवा जे बऱ्याच महिन्यांपासून अंथरुणाला खिळलेले आहेत अशा नागरिकांना १ ऑगस्टपासून घरोघरी जाऊन लस देण्याची तयारी मुंबई महापालिके ने के ली आहे. मुंबईत असे नक्की किती रुग्ण आहेत त्यांची माहिती गोळा के ली जात आहे. आतापर्यंत अशा साडेतीन हजार नागरिकांनी पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. या नागरिकांना १ ऑगस्टपासून घरी जाऊन लस देण्यासाठी पालिकेने पूर्वतयारीही सुरू के ली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, साडेतीन हजार लोकांची नावे पुढे आलेली असून हे नागरिक कोणत्या विभागात राहतात, कोणत्या हेल्थ पोस्टच्या कार्यक्षेत्रात येतात याचे वर्गीकरण करण्याचे काम सुरू आहे. राज्य सरकारची नियमावली आल्यानंतर त्यानुसार आरोग्य पथके  तयार करून ती घरोघरी पाठवू, असेही त्यांनी सांगितले.

लसीकरण करताना एक कु पी उघडल्यानंतर त्यात दहा मात्रा असतात. त्यामुळे घरोघरी लसीकरण करताना या उरलेल्या मात्रांचे नियोजन कसे करावे, याबाबत नियमावलीनुसार अंमलबजावणी के ली जाईल, असेही अधिकोऱ्यांनी सांगितले. तसेच लस दिल्यानंतर अर्धा तास रुग्णाचे निरीक्षण करावे लागते. त्याबाबतही नियमावलीत काही मार्गदर्शक सूचना असल्याची त्याची प्रतीक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.

माहिती पाठवण्याचे आवाहन

जे नागरिक आजारपणासह शारीरिक / वैद्यकीय कारणांनी अंथरुणास खिळून आहेत, अशा व्यक्तींचे नाव, वय, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणास खिळून असण्याचे कारण इत्यादी माहिती नागरिकांनी covidvaccsbedridden@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.