वांद्रे परिसरातील ७० अनधिकृत झोपडय़ा पाडल्या
अनधिकृत झोपडय़ांच्या विरोधात महापालिका प्रशासनाने सोमवारी धडक कारवाई करीत वांद्रे (पश्चिम) भागातील रंगशारदा आणि लीलावती रुग्णालयाच्या परिसरातील ७० अनधिकृत झोपडय़ा उद्ध्वस्त केल्या.
या कारवाईच्या वेळी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वांद्रे पूर्व आणि पश्चिम परिसरात गेल्या काही वर्षांत अनधिकृत झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत. महापालिकेच्या एच-पश्चिम विभागाने ही धडक कारवाई केली. सकाळी दहा वाजता सुरू झालेली ही मोहीम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.
एच-पश्चिम विभागाचे साहाय्यक आयुक्त शरद उघडे यांच्या नेतृत्वाखाली पालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनी ही कारवाई केली.