महिनाभरात ८०४ फलकांवर कारवाई

मुंबई : शहर विद्रूप करणाऱ्या राजकीय फलकबाजीवर न्यायालयाने बंदी घालूनही मुंबईत सध्या राजकीय पक्षांच्या वतीने फलकबाजी केली जात आहे. गणपती आणि त्यानंतर आता नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देणारे राजकीय पक्षांचे फलक ठिकठिकाणी बिनदिक्कत लावण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरात पालिकेने पाच हजारांहून अधिक फलकांवर कारवाई केली आहे. तर गेल्या महिनाभरात ८०४ राजकीय फलकांवर कारवाई करण्यात आली आहे. राजकीय पक्षांना न्यायालय आणि महापालिकेचीच भीती न राहिल्याने या फलकबाजीला आळा घालणार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
Gudi Padwa Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला बाजारात उत्साह, ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन
Maharangoli of bharadhana at Godaghat to welcome the new year
नववर्ष स्वागतासाठी गोदाघाटावर भरडधान्याची महारांगोळी, सोमवारी युध्दकलेचे प्रात्यक्षिक

विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून केल्या जाणाऱ्या फलकबाजीमुळे शहर बकाल होत असल्याने २०११मध्ये न्यायालयाने सर्व फलकांवर कारवाई करून ते काढून टाकण्याचे आदेश दिले होते. तसेच, फलकबाजीवर बंदी घातली होती. त्यानंतर मुंबईतील सर्व राजकीय फलकांवर कारवाई करून पाच दिवसांत सर्व फलक काढून टाकण्यात आले. परंतु न्यायालयाची बंदी असताना पुन्हा एकदा राजकीय फलकबाजीमुळे मुंबईला विद्रूप केले जाऊ लागले आहे. मागील गणेशोत्सवात शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी     तसेच पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठय़ा प्रमाणात फलक लावले होते. त्यानंतर आता नवरात्रोत्सवातही असेच चित्र दिसून येत आहे.

गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात मंडपापासून १०० मीटर परिसरातच जाहिरात लावण्यास परवानगी आहे. परंतु शिवसेना भवनसह दादर, माहीम तसेच दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक भागांमधील रस्ते आणि चौकांमध्ये राजकीय फलकबाजी करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेना आणि भाजप आघाडीवर असून मुंबईला विद्रूप करणाऱ्या राजकीय फलकांवर आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करण्यास महापालिका प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत आहे.

राजकीय पक्षांच्या फलकांवर जरब बसेल अशी कारवाई होत नसल्याने भीती राहिलेली नाही. महापालिका कारवाई केल्यानंतर फलक लावणाऱ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात दावे करते. काहींविरोधात फौजदारी गुन्हेही दाखल केले जातात. परंतु त्यापलीकडे महापालिका काहीच करत नाही, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

महिनाभरात ८०४ राजकीय फलकांवर कारवाई

मागील महिन्यात मुंबईतील ८०४ राजकीय फलकांवर कारवाई केल्याचे महापालिकेच्या परवाना विभागाचे अधीक्षक शरद बांडे यांनी सांगितले. यापैकी ४६ फलकांबाबत संबंधितांविरोधात न्यायालयात दावे करण्यात आले आहे, तर २४ फलकांसंदर्भात पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय पक्षांच्या वतीने लावल्या जाणाऱ्या जाहिरातींच्या फलकांवर महापालिकेच्या प्रत्येक विभागातील परवाना विभागाच्या पथकामार्फत कारवाई केली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वर्षभरातील राजकीय पक्षांच्या फलकांवरील कारवाई

’ एकूण कारवाई : ५६६८

’ न्यायालयातील दावे : ८६४

’ फौजदारी गुन्हे : ५३५