शहराच्या स्वच्छतेत खारीचा वाटा उचलणाऱ्या कचरावेचक महिलांना मुख्य प्रवाहात आणून पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावण्याबाबत प्रशासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत. शहरात सुमारे दोन हजार कचरावेचक महिला असून त्यांच्यामार्फत गृहनिर्माण संस्थांमध्ये जमा होणारा कचऱ्याची विल्हेवाट लावल्याने पूर्ण क्षमतेने भरत आलेल्या डम्पिंग ग्राउंडवरील भार कमी होण्यास मदत होईल.
रस्त्यांवर, गटारात, डम्पिंग ग्राउंडवर जमा झालेल्या कचऱ्यातून भंगारात विकले जाणारे कागद, बाटल्या, लाकूड, लोखंड इत्यादी सामान बाजूला करणारे कचरा वेचक शहरातील कचरा व्यवस्थापनाचा भाग आहेत. मात्र आजवर पालिकेकडून त्यांच्याकडे फारसे लक्ष देण्यात आलेले नाही. उलट व्यवस्थापनात अडचण निर्माण करणारे घटक याच दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांची अडवणूकही होते. मात्र कचऱ्यावर उपजीविका चालवणाऱ्या महिलांना घनकचरा व्यवस्थापनात सहभागी करून घेण्याचा विचार पालिका करत आहे. स्त्री मुक्ती संघटनेकडून २००१ पासून कचरावेचक महिलांचे संघटन व प्रशिक्षण सुरू झाले. या महिलांची परिसर भगिनी विकास संघ या नावाने संस्थाही सुरू झाली. पालिकेकडून त्यांना काही ठिकाणी सुका कचरा वर्गीकरणासाठी शेड उभारून देण्यात आले. मात्र तरीही मुख्य व्यवस्थापनात कचरावेचकांचा समावेश आतापर्यंत करून घेण्यात आला नव्हता.
पालिकेच्या योजनेमुळे कचरावेचक महिलांनाही वणवण भटकावे न लागता थेट काम उपलब्ध होऊ शकेल, अशी माहिती नियोजन विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्राची जांभेकर यांनी दिली.
स्त्री मुक्ती संघटनेकडून अनेक वर्षे कचरावेचक महिलांना संघटीत केले जात आहे. कचरावेचक महिलांचा शहराच्या कचराव्यवस्थापनात महत्त्वाचा वाटा असतो. मात्र काही ठिकाणी शेड उभारून पलिकडे आतापर्यंत पालिकेकडून त्यासंदर्भात कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. कचरावेचक महिलांना सहभागी करून घेतल्यास त्याचा फायदा पालिकेलाही होईल, असे संघटनेच्या ज्योती म्हापसेकर यांनी सांगितले.

कचराव्यवस्थापनात योगदान
एकीकडे सोसायटीमध्ये ओला- सुका कचरा वर्गीकरण करण्याबाबत पालिकेने सूचना दिल्या असल्या तरी असा सुका कचरा वाहून नेण्यासाठी प्रभावी यंत्रणा नाही. त्यामुळे हा कचरा जागेवरच वेगळा करून ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचे तर सुके सामान भंगारात काढण्याचे काम या कचरावेचक महिलांवर सोपवण्यात येईल. त्यामुळे कचरा वाहून नेण्याचा खर्च तसेच डम्पिंग ग्राउंडवर पडणाऱ्या कचऱ्यात घट होऊ शकेल.

ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?