03 March 2021

News Flash

२४४ ठिकाणी आजपासून मोफत करोना चाचणी

करोना चाचणी करण्याची सुविधा पालिका क्षेत्रात ३०० पेक्षा अधिक ठिकाणी उपलब्ध होईल.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : पालिकेतर्फे २ नोव्हेंबरपासून २४४ ठिकाणी मोफत कोविडविषयक वैद्यकीय चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या सुविधेमुळे करोना चाचणी करण्याची सुविधा पालिका क्षेत्रात ३०० पेक्षा अधिक ठिकाणी उपलब्ध होईल.

पालिकेच्या अखत्यारीतील विविध दवाखाने, रुग्णालये अशा एकूण २४४ ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

या २४४ ठिकाणांच्या पत्त्यांची यादी विभागनिहाय नियंत्रण कक्षांद्वारे आणि महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या क्रमांकाद्वारेही उपलब्ध करून देण्यात येत आहे. http://stopcoronavirus.mcgm.gov.in या संकेतस्थळावरदेखील यादी उपलब्ध असेल. सुरुवातीस रोज सकाळी १० ते १२ या कालावधीत ही चाचणी सुविधा केंद्रावर ‘वॉक इन’ पद्धतीने उपलब्ध असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2020 1:34 am

Web Title: bmc to start free corona test from today at 244 places in mumbai zws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 झोपु योजनेत ३०० चौरस फूट घरासाठी वाहनतळावर गदा
2 ओला कंपनीचे जुने अ‍ॅप वापरून प्रवाशांची लूट; चालक अटकेत
3 राज्यातही २,२०० कोटींची वाढ
Just Now!
X