News Flash

अतिक्रमणे हटविण्यासाठी पालिकेला १ हजार २०० पोलीस हवेत

अतिक्रमणे हटविण्यासाठी पालिकेला पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने या कारवाईत अडथळे येत आहेत.

मुंबई शहर आणि उपनगरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिकेला १ हजार २०० पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी ‘मनसे’ने केली आहे. मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी एका ठरावच्या सूचनेने ही मागणी केली असून हा ठराव मंजुरीसाठी डिसेंबर महिन्यात पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे.
अतिक्रमणे हटविण्यासाठी पालिकेला पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने या कारवाईत अडथळे येत आहेत. त्यामुळे पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळाला तर ही कारवाई चांगल्या प्रकारे करता येईल. शहर आणि उपनगरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी स्वतंत्र पोलीस ताफा कायम स्वरूपी तैनात केला जावा, अशी मागणीही देशपांडे यांनी या ठरावाद्वारे केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 1:29 am

Web Title: bmc want 1 thousand 200 police
टॅग : Bmc
Next Stories
1 मुंबईत आज आणि उद्या मराठवाडा महोत्सव
2 महापालिकेने रद्दी उचलण्यासाठी दहा लाख रुपये मोजले!
3 ‘सन्मान नवदुर्गाचा’ एबीपी माझावर
Just Now!
X