News Flash

मुंबई महानगरपालिकेची ७०० कोटींचा कामे अपूर्ण

मुंबईतील मिठी नदीच्या सुधारणेसाठी करण्यात येत असलेल्या कामांपैकी तब्बल ७०० कोटींची कामे अद्याप पूर्ण झाली नसल्याची बाब समोर आली आहे.

| March 27, 2014 02:55 am

मुंबईतील मिठी नदीच्या सुधारणेसाठी करण्यात येत असलेल्या कामांपैकी तब्बल ७०० कोटींची कामे अद्याप पूर्ण झाली नसल्याची बाब समोर आली आहे. मिठी नदी आणि त्यावरील पुलांच्या बांधकामांसाठी महापालिकेच्या नागरी विभागातर्फे १२४० कोटी रुपयांची तरतूद करून ठेवण्यात आली होती. मात्र, सात वर्ष उलटूनही मिठी नदीच्या दुस-या टप्प्यातील कामे पूर्ण झालेलीच नाहीत. मिठी नदीची एकूण लांबी १७.८४ कि.मी. असून त्यापैकी ११.८४ किलोमीटरचा भाग मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित येतो तर उर्वरित विभाग मिठी नदी विकास आणि संरक्षण प्राधिकरणाच्या अखत्यारित येतो. या प्राधिकरणाच्या अखत्यारित येणा-या मिठी नदीच्या भागातील ८० कोटींची विकासकामे अपूर्ण आहेत. तर मुंबई महानगरपालिकेच्या कक्षेत येणा-या मिठी नदीच्या भागात ७०० कोटींची विकासकामे पूर्ण होण्याची बाकी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 2:55 am

Web Title: bmc yet to complete works worth over rs 700 crore
Next Stories
1 वकासचा ताबा मिळविण्यासाठी एटीएसचे अधिकारी उत्सुक
2 शिक्षणव्यवस्थेची परीक्षा
3 ‘कोकणचा राजा’ मुंबईत
Just Now!
X