27 February 2021

News Flash

बॉलिवूड अभिनेता सचिन जोशीला ईडीकडून अटक

१८ तासांच्या चौकशीनंतर करण्यात आली अटकेची कारवाई

बॉलिवूड अभिनेता आणि उद्योजक सचिन जोशीला सक्तसवसुली संचलनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली आहे. ओमकार रिअ‍ॅल्टर्स प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार ग्रुप प्रमोटर्स आणि सचिन जोशीकडून करण्यात आलेल्या १०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अटकेची कारवाई करण्याआधी सचिन जोशीची १८ तास चौकशी करण्यात आली होती.

सचिन जोशीने विजय मल्ल्याचा गोव्यामधील किंगफिशर व्हिला खरेदी केला आहे. याशिवाय अनेक शहरांमध्ये रेस्तराँ आणि क्लब असणाऱ्या प्लेबॉय फ्रॅचाइजीचा तो मालक आहे. ओमकार रिअ‍ॅल्टर्स प्रकरणी सचिन जोशीला ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र समन्स बजावल्यानंतही सचिन जोशी ईडी कार्यालयात हजर झाला नव्हता. यानंतर त्याला चौकशीसाठी दक्षिण मुंबईतील कार्यालयात आणण्यात आलं होतं.

सचिन जोशीने मॉडेल आणि अभिनेत्री उर्वशी शर्मासोबत लग्न केलं आहे. तेलुगू, कन्नडा तसंच काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. पान मसाल्यात वापरल्या जाणाऱ्या खाद्य परफ्यूमची निर्मिती करणं हा सचिन जोशीच्या जे एम जोशी ग्रुपचा मुख्य व्यवसाय आहे. याशिवाय रेस्तराँ आणि मद्य व्यवसायही या ग्रुपकडून केला जातो.

सचिन जोशीने २०१७ मध्ये भारतातून फरार झालेल्या विजय मल्ल्याचा गोव्यातील बंगला ७३ कोटींना खरेदी केला होता. आयकर विभागानेदेखील गेल्या आठवड्यात सचिन जोशीच्या निवासस्थानी आणि कार्लयांची छापा टाकला होता. जवळपास तीन ते चार तास अधिकाऱ्यांकडून तपास सुरु होता.

ईडीने याआधी ओमकार ग्रुपचे चेअरमन कमाल गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांना मनी लॉण्डरिंग प्रकरणी अटक केली आहे. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांध्ये सहभागी असलेल्या अनेक मोठ्या कंपन्यांपैकी ओमकार ग्रुप एक आहे. याशिवाय मुंबईत अनेक मोक्याच्या ठिकाणी ओमकार ग्रुपचे प्रकल्प सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2021 8:18 am

Web Title: bollywood actor sachin joshi arrested by ed sgy 87
Next Stories
1 “हा फोटो खास नाही, पण…; अनुष्कानं ‘व्हॅलेंटाईन’निमित्ताने पोस्ट केला विराटसोबतचा क्षण
2 अर्जुन कपूरचा हटके व्हॅलेन्टाईन! १०० कर्करोगग्रस्त कपल्सना करणार मदत
3 अभिनय बेर्डे येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X