News Flash

दीपिका पाठोपाठ अभिनेत्री श्रद्धा कपूरही एनसीबी कार्यालयात दाखल

ड्रग्ज प्रकरणी होणार श्रद्धा कपूरची चौकशी

अभिनेत्री दीपिका पदुकोण पाठोपाठ अभिनेत्री श्रद्धा कपूरदेखील चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोणसोबत श्रद्धा कपूर आणि सारा अली खानचंदेखील नाव समोर आलं आहे. त्यामुळे आज या तिघींची एनसीबी चौकशी करणार आहे.

ड्रग्जप्रकरणी श्रद्धा कपूरचं नाव आल्यामुळे बुधवारी तिला एनसीबीने समन्स बजावले होते. त्यानंतर शनिवारी ( २६ सप्टेंबर) ती चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर झाली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्जच्या अँगलबाबत एनसीबी तपास करत आहे. रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर या तपासात आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समोर आली. सुशांतच्या लोणावळ्यातील शेतघरी केलेल्या चौकशीत एनसीबी पथकाला श्रद्धाबाबत माहिती मिळाली होती.

दरम्यान, २५ सप्टेंबर रोजी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि दीपिका पदुकोनची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांची एनसीबीने चौकशी केली. यात जवळपास चार तास रकुलची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज दीपिका पदुकोन, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांची चौकशी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 12:05 pm

Web Title: bollywood actress shraddha kapoor arrives at ncb sit office ssj 93
Next Stories
1 “बिहारमधील निवडणुकीचे मुद्दे संपले असतील तर मुंबईतून…,” संजय राऊतांचा टोला
2 अभिनेत्री दीपिका पदुकोण चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल
3 दीपिका पदुकोणची आज ‘एनसीबी’कडून होणार चौकशी
Just Now!
X