१४ डिसेंबरला जामिनावर सविस्तर सुनावणी

मुंबई : शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेले कवी-लेखक वरवरा राव यांच्या प्रकृतीत सुधारणा असली तरी १४ डिसेंबपर्यंत त्यांना नानावटी रुग्णालयातच ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. तसेच राव यांनी आरोग्याच्या कारणास्तव जामिनाच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर १४ डिसेंबरलाच सविस्तर सुनावणी घेण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

राव यांना १८ नोव्हेंबरला नानावटी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तसेच त्यांची पूर्ण वैद्यकीय तपासणी करण्याचे आणि त्याचा अहवाल सादर करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर राव यांच्या जामिनाची मागणी करणाऱ्या तसेच त्यांना नानावटी रुग्णालयात हलवण्याच्या त्यांची पत्नी हेमलता यांनी केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी राव यांच्या प्रकृतीचा अहवाल रुग्णालयातर्फे न्यायालयात सादर करण्यात आला. तसेच राव यांच्या प्रकृतीत किंचितशी सुधारणा असल्याचे अहवालातून दिसते. असे असले तरी १४ डिसेंबपर्यंत म्हणजेच प्रकरणाच्या पुढील सुनावणीपर्यंत त्यांना नानावटी रुग्णालयातच ठेवण्यात यावे, असे आदेश न्यायालयाने दिले. राव यांचे वकील आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) वकिलांनी नानावटी रुग्णालयाने सादर केलेला वैद्यकीय अहवाल पाहावा, असे सांगताना राव यांनी आरोग्याच्या कारणास्तव के लेल्या जामिनाच्या, तर त्यांना नानावटी रुग्णालयात हलवण्याच्या त्यांच्या पत्नीने के लेल्या याचिके वरही १४ डिसेंबरला सविस्तर सुनावणी घेण्याचे न्यायालयाने स्पष्ट के ले.

न्यायालयाचे म्हणणे..

राव हे ८१ वर्षांचे असून त्यांना मेंदूशी संबंधित विकार आहेत. करोनानंतर त्यांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अशा स्थितीत कारागृहातील रुग्णालयातच उपचार करण्याची भूमिका सरकार घेऊ शकत नाही, असे नमूद करत े राव यांना न्यायालयाने नानावटी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले होते.