News Flash

१९९३ मुंबई बॉम्बस्फोट: रुबिना मेमनला फर्लो रजा देण्यास हायकोर्टाचा नकार

रुबिना याकूब मेमनच्या भावाची पत्नी

मुंबई हायकोर्ट (संग्रहित छायाचित्र)

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी रुबिना मेमनची फर्लोवर सुटका करण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. रुबिना ही या बॉम्बस्फोटाप्रकरणी फाशी झालेल्या याकूब मेमनच्या भावाची पत्नी आहे. रुबिनाला मुंबईत आल्यास तिच्या सांत्वनासाठी अनेक जण येतील असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

याचिकाकर्ता रुबिना मेमनला टाडा न्यायालयाने दहशतवादी कृत्याप्रकरणी दोषी ठरवले असल्याने तिला फर्लो रजा मिळू शकणार नाही असे मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती व्ही के ताहिलरमानी आणि एम ए बडार यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. बॉम्बस्फोटाच्या कटात सहभागी असलेला आणि सध्या पाकिस्तानमध्ये राहणा-या टायगर मेमनची रुबिना वहिनी आहे. १९९३ च्या बॉम्बस्फोटाप्रकरणी टाडा न्यायालयाने रुबिनाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर रुबिनाच्या पतीची सबळ पुराव्या अभावी सुटका झाली होती.

रुबिना सध्या पुण्यातील येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. रुबिनाने फर्लो रजेसाठी अर्ज केला होता. मात्र मे महिन्यात तिचा अर्ज फेटाळण्यात आला. यानंतर रुबिनाने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. रुबिनाच्या वकिलांनी हायकोर्टात याच प्रकरणात शिक्षा झालेल्या तीन जणांना फर्लो रजा मंजूर झाल्याचे निदर्शनास आणून दिले. तर सरकारी वकिलांनी २०१२ मधील तुरुंग अधिनियम कायद्यातील एक परिपत्रक सादर केले. यानुसार दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांना फर्लो मिळू शकत नाही असे वकिलांनी सांगितले. रुबिना ही याकूबची वहिनी आहे. त्यामुळे ती मुंबईत आल्यास अनेकजण तिच्या सांत्वनाला येतील असे वकिलांनी निदर्शनास आणून दिले. रुबिना मुंबईत आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर हायकोर्टाने रुबिनाला फर्लो देण्यास नकार दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 3:58 pm

Web Title: bombay hc rejects furlough plea of 1993 blasts convict rubina memon
Next Stories
1 मुंबई महापालिका निवडणुकीचा बिगूल वाजला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2 BLOG: रेल्वेरुळाची ‘मन की बात’, हे प्रभू..
3 मध्य रेल्वे सेवा विस्कळीत; प्रवाशांसमोर हे आहेत पर्याय
Just Now!
X