मुंबई : ‘तांडव’ या वेबमालिकेचे दिग्दर्शक अली अब्बास जफर, ‘अॅमेझॉन प्राइम इंडिया’च्या प्रमुख अपर्णा पुरोहित, निर्माता हिमांशू मेहरा आणि लेखक गौरव सोलंकी यांना उच्च न्यायालयाने बुधवारी अटकेपासून तीन आठवडय़ांचा दिलासा दिला.
हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणारे संवाद या वेबमालिकेत आहेत, असा आरोप करत लखनौ येथे या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी उत्तर प्रदेश पोलीस या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत दाखल झाले. त्या पाश्र्वभूमीवर याचिकाकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
गुन्हा नोंद
‘तांडव’चे निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कलाकारांसह अॅमेझॉन प्राइमच्या पदाधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. ही कारवाई भाजप आमदार राम कदम यांच्या तक्रारीनुसार करण्यात आली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 21, 2021 12:42 am