News Flash

विखे, क्षीरसागर व महातेकरांना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस

नोटीसीला उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई उच्च न्यायालयाने राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर यांना नोटीस पाठवली आहे. या तिघांनी नुकतीच मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. न्यायालयाने त्यांना उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी दिला आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला यामध्ये राधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर या नेत्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली. मात्र,  त्यांच्या मंत्रिपदावर आक्षेप घेण्यात आला होता मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर यांसारख्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोडाफोडी करून सहा महिन्यांसाठी त्यांना मंत्रिपद देणे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला राजकीय भ्रष्टाचार आहे. असा आरोप काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. तर रिपाइंचे अविनाश महातेकर हे निवडून आलेले नाहीत. तरीही त्यांना मंत्रिपद देण्यात आले असून ते निवडून येणे आवश्यक आहे. सहा महिन्यांत ते कसे शक्य आहे, असा प्रश्नही चव्हाण यांनी उपस्थित केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2019 3:23 pm

Web Title: bombay high court has issued notice to vikhe patilkshirsagar and mahtekar msr87
Next Stories
1 कुठल्याही क्षणी मुंबईवर वरूणराजा बरसणार!
2 मुंबईत बलात्कारानंतर ब्लॅकमेलिंग, विवाहितेचा फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
3 विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड
Just Now!
X