News Flash

मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना १३,५०० रुपये बोनस

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात कर्मचाऱ्यांच्या हाती बोनसची रक्कम पडणार आहे.

मुंबई महानगर पालिका

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीनिमित्त १३,५०० रुपये बोनस देण्याची घोषणा महापौर स्नेहल आंबेकर यांनी शुक्रवारी केली. कर्मचाऱ्यांच्या बोनसपोटी पालिकेच्या तिजोरीवर १६९ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात कर्मचाऱ्यांच्या हाती बोनसची रक्कम पडणार आहे.
पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून बोनस देण्याबाबत महापौरांच्या दालनात शुक्रवारी गटनेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पालिका आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये बोनस देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना १३,००० रुपये बोनस देण्यात आला होता. मात्र यंदा कर्मचाऱ्यांच्या संख्येत १० टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे गेल्या वर्षी इतका बोसन देणे शक्य नसल्याचे आयुक्त अजय मेहता यांनी या बैठकीत स्पष्ट केले. मात्र गटनेत्यांनी गेल्या वर्षीपेक्षा अधिक बोसन देण्याची मागणी वारंवार केल्यामुळे अखेर १३,५०० रुपये देण्याची तयारी आयुक्तांनी दर्शविली. त्यामुळे सुमारे १,१७,५२१ कर्मचाऱ्यांना १३,५०० रुपये बोनस मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2015 12:33 am

Web Title: bonus to bmc servants
Next Stories
1 सांताक्रूझ चोरीप्रकरणी दोघांना अटक
2 मुख्यमंत्र्यांचा ‘गुगल हँगआऊट’ द्वारे लोकसत्ताच्या वाचकांशी संवाद
3 मुख्यमंत्री, संपादकांसोबत आज ‘गुगल हँगआऊट’!
Just Now!
X