पुत्रप्राप्तीची शिकवण देणारे, तसेच वर्ण व्यवस्था, जातिव्यवस्थेचे समर्थन करणारे पुस्तक अखेर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बीएच्या अभ्याक्रमातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाने ३ ऑगस्टला तशी अधिसूचना जारी केली आहे. विद्यापीठाचे कुलसचिव अजित देशमुख यांनी त्याला दुजोरा दिला. आरोग्य विभागाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली.

समाजातील जातीव्यवस्था, अंधश्रद्धा, जुन्या अनिष्ट प्रथा-परंपरा नष्ट व्हाव्यात, यासाठी आयुष्य वेचणारे संत गाडगे बाबा यांच्या नावाने असलेल्या अमरावती विद्यापीठाच्या प्रथम वर्ष बीएच्या अभ्यासक्रमात पुत्रप्राप्ती, जातीव्यवस्था यांचे समर्थन करणाऱ्या भारताचा इतिहास या पुस्तकाचा समावेश करण्यात आला होता. लोकसत्ताने या संदर्भात २७ मे २०१७ रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. मुलीच्या जन्माला कमी लेखून पुत्रप्राप्तीचे उपाय सुचविणे व त्याचा प्रचार-प्रसार करणे हा गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निवडीस प्रतिबंध (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार गुन्हा ठरविण्यात आला आहे. मात्र तरीही भारताचा इतिहास नावाच्या पुस्तकातून पुत्रपाप्तीसंबंधीच्या पुसंवन विधीची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या कायद्याचा भंग होत आहे. समाजाचे विभाजन करणारी वर्णव्यवस्था, जातीव्यवस्थेचेही या पुस्तकात जोरदार समर्थन करण्यात आले आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी आरोग्य सेवा कटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालकांकडे तक्रार करून विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हे पुस्तक वगळावे, अशी मागणी केली होती. त्याची दखल घेऊन आरोग्य विभागाने त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश अमरावती जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले होते.

या संदर्भात अलीकडेच आरोग्य विभागाच्या आदेशानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांनी भारताचा इतिहास या पुस्तकातील पुत्रपाप्तीसंबंधीच्या मजकुरामुळे पीसीपीएनडीटी कायद्याचा भंग होत आहे, त्याबद्दल अमरावती विद्यापीठाला नोटीस देऊन खुलासा मागितला होता. त्यानंतर विद्यापीठाने अभ्यास मंडळाची तातडीने बैठक बोलावून त्यात हा विषय ठेवण्यात आला. त्यावर अभ्यास मंडळाने बीएच्या अभ्यासक्रमात संदर्भ पुस्तक म्हणून समावेश करण्यात आलेले भारताचा इतिहास हे पुस्तक वगळावे अशी शिफारस केली होती, असे कुलसचिव देशमुख यांनी सांगितले. त्या शिफारशीनुसार विद्यापीठाने २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांपासून हे पुस्तक रद्द करण्याचा अंतिम निर्णय घेतला व तशी अधिसूचनाही जारी केली आहे.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा

D Y Chandrachud News in Marathi
‘न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न’; २१ निवृत्त न्यायाधीशांनी डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहित व्यक्त केली चिंता

youth beaten, love jihad
‘लव्ह जिहाद’चा आरोप करून तरुणाला मारहाण… सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकार

Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत