गेली काही वर्षे सातत्याने वादात असलेले विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन कमी करण्यासाठी शिक्षण विभाग नवा प्रयोग करणार आहे. पहिली ते सातवी पर्यंत सर्व विषयांचे एकच पुस्तक तयार करण्यात येणार आहे. तीन महिन्यांमध्ये शिकवणे अपेक्षित असलेला अभ्यासक्रम एक किंवा दोन पुस्तकांमध्ये देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे हा विषय सातत्याने चर्चेत असतो. न्यायालयाने या मुद्दय़ावरून शिक्षण विभागाला वारंवार फटकारले. मनुष्यबळ विकास मंत्रालयानेही विभागाकडे अहवाल मागितला होता. अनेक शाळा विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांचा अतिरिक्त संच शाळेत ठेवतात. मात्र, शासकीय शाळांना प्रत्येक वेळी हे परवडणारे नसल्याचे लक्षात आले.

CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
National Medical Commission, Denies Approval for New Medical Colleges, Medical Colleges and Seat Increase, 2024 2025 Academic Year, medical students, medical seats in india, medical seats
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा, महाविद्यालयांमध्ये वाढ? राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने काय सांगितले?
Printing of NCERT textbooks by private publishers without permission
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांना ‘पायरसी’ची वाळवी… झाले काय?
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

आता प्रत्येक विषयाचे स्वतंत्र पुस्तक ठेवण्याऐवजी सर्व विषयांचा समावेश असलेले एकच पुस्तक विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. सुरूवातीला पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी काही जिल्ह्य़ांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपाय अमलात येणार आहे. शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी शिक्षण विभागातील अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली. त्यामध्ये विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्याबरोबच एकत्रित पुस्तके तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

द्विभाषिक पुस्तके एकत्रित पुस्तकांप्रमाणेच पुस्तके द्विभाषिक करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. भाषेव्यतिरिक्त इतर विषयांच्या पुस्तकांत संकल्पना इंग्रजीतूनही देण्यात येणार आहेत. सेमी इंग्रजी शाळांसाठी स्वतंत्र पुस्तके असावीत या मागणीला जोडून द्विभाषिक पुस्तकांची कल्पना विभागाच्या विचाराधीन होती. येत्या शैक्षणिक वर्षांत प्रायोगिक तत्त्वावर अशी पुस्तके तयार करण्यात येणार आहेत.

रचना कशी? : प्रत्येक इयत्तेला सध्या प्रत्येक विषयाचे स्वतंत्र पुस्तक आहे. विद्यार्थ्यांना रोजच्या वेळापत्रकाप्रमाणे किमान तीन पुस्तके शाळेत घेऊन जावी लागतात. त्याऐवजी आता एकच पुस्तक विद्यार्थ्यांना न्यावे लागेल अशी रचना करण्यात येणार आहे. वर्षभराच्या नियोजित अभ्यासक्रमानुसार पाठय़पुस्तकाचे तीन महिन्यांनुसार वर्गीकरण करण्यात येईल. एकाच पुस्तकात विषयानुसार भाग करून तीन महिन्यांचा अभ्यासक्रम देण्यात येईल. विद्यार्थ्यांना वर्षभरात अशी तीन ते चार पुस्तके देण्यात येतील, अशी महिती अधिकाऱ्यांनी दिली. काही जिल्हापरिषदांनी हा प्रयोग केला होता. ठाणे महापालिकेतही हा प्रयोग करण्याबाबत चर्चा आहे. मात्र, त्याला विरोधही करण्यात येत आहे.