News Flash

बोरीबंदर-ठाणे पहिल्या रेल्वेसेवेला १६७ वर्ष पूर्ण

टाळेबंदीमुळे ना सत्कार, ना समारंभ

टाळेबंदीमुळे ना सत्कार, ना समारंभ

मुंबई : बोरीबंदर ते ठाणे या आशिया खंडातील पहिल्या रेल्वेसेवेला १६ एप्रिलला १६७ वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र टाळेबंदीमुळे संपूर्ण लोकल सेवाच बंद असल्याने १६८ वा वाढदिवस कु ठल्याही समारंभाविना पार पडणार आहे. ट्विटर, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवर पहिल्या रेल्वेचे छायाचित्र, माहिती दिली जाईल. तर प्रवासी संघटनांपैकी काही सदस्य ठाणे स्थानकाला भेट देऊन आठवणींना उजाळा देणार आहेत.

१६ एप्रिल १८५३ ला दुपारी ३.३५ वाजता बोरीबंदर ते ठाणे अशी पहिली रेल्वे धावली. ३३.८ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी ५७ मिनिटे लागली. १४ डब्यांच्या या गाडीत त्यावेळी ४०० प्रवाशांनी प्रवास के ला.

हळूहळू या सेवेचा विस्तार होऊ लागला. आता मध्य रेल्वेवरील लोकल सेवेचा विस्तार सीएसएमटी ते कल्याण, खोपोली, कसारा, पनवेल तर पश्चिम रेल्वे चर्चगेट ते विरार, डहाणूपर्यंत आहे. प्रत्येक वर्षी रेल्वे प्रवासी संघटनांकडून रेल्वेचा वाढदिवस साजरा के ला जातो. ठाणे स्थानकात फलाट क्र मांक दोनवर स्टेशन मास्तर कार्यालयाजवळच के क कापला जातो. यावेळी गँगमन, ट्रॅकमन, स्टेशन मास्तर इत्यादींचा सत्कारही करण्यात येतो. परंतु यंदा हा वाढदिवस साजरा करणे शक्य होणार नाही.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे मुंबईची उपनगरीय लोकल गेले २५ दिवस बंद आहे. ३ मेपर्यंत ती बंदच राहणार आहे.

सध्या रेल्वेचे कर्मचारी विलगीकरण डबे, मास्क, सॅनिटायझर बनविण्यात गुंतले आहेत. के वळ जीवनावश्यक वस्तूंसाठी मालगाड्या, पार्सल ट्रेन चालवल्या जात आहेत. वाढदिवशी या कर्मचाऱ्यांच्या कार्याला रेल्वे प्रशासनाकडून ‘सलाम‘ के ला जाईल,  असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

आठवण म्हणून जुने इंजिन बसवा

या वर्षी प्रथमच वाढदिवशी लोकल बंद होती. ठाणे स्थानकातील हद्दीत पहिल्या रेल्वेची आठवण म्हणून जुने इंजिन बसवण्याची मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे अध्यक्ष नंदकु मार देशमुख यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 1:37 am

Web Title: boribandar thane first railway service completed 167 years zws 70
Next Stories
1 जमावबंदीबाबत गांभीर्य नाही!
2 डॉ. गिरीश ओक यांचे ‘चिवित्रा’ख्यान यूटय़ूबवर
3 ‘सेव्हन हिल्स’साठी डॉक्टर, परिचारिकांची तात्पुरती भरती
Just Now!
X