09 August 2020

News Flash

‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू?

केईएम रुग्णालयाने चुकीचे औषध दिल्यामुळे नऊ वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पालकांची पोलिसांत तक्रार

मुंबई : बेजबाबदार कारभारामुळे चर्चेत असलेल्या केईएम रुग्णालयाने चुकीचे औषध दिल्यामुळे नऊ वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

केईएम रुग्णालयात प्रिन्स राजभर या चार महिन्यांच्या बाळाचा सदोष यंत्रामुळे होरपळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता चुकीच्या औषधामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णालयावर करण्यात आला आहे.

केईएम रुग्णालयातून नऊ  वर्षांच्या मुलाला दोन दिवसांपूर्वी घरी पाठवण्यात आले होते. त्याला दिलेल्या औषधांपैकी एक मोठय़ा आकाराची गोळी गरम दुधातून घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. या मुलाने ही गोळी गरम दुधातून घेतली, परंतु ती घशात अडकल्याने त्याला गुरुवारी अस्वस्थ वाटू लागले. रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.

चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा तक्रार अर्ज त्याच्या पालकांनी दिल्याचे वरळी पोलिसांनी सांगितले. दरम्यान, बालकाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयात आणण्यात आले होते, असे  केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी स्पष्ट केले.

शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2019 2:26 am

Web Title: boy died from wrong medication in kem hospital zws 70
Next Stories
1 नक्षलवाद्यांनी केलेल्या हिंसेविरोधातील लिखाणाचे अमर्त्य सेन यांच्याकडूनही कौतुक
2 प्रा. रमेशचंद्र जोशी यांचे निधन
3 रविवारी पश्चिम रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
Just Now!
X