कळव्यातील अशोकनगरमध्ये राहणाऱ्या १५ वर्षांच्या मुलाचा शनिवारी याच भागातील न्यू शिवाजीनगर येथे संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. भारत ऊर्फ मारू राठोड असे या मुलाचे नाव असून त्याच्या शरीरावर होरपळल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत.
या भागातील सीसीटीव्ही फुटेजमधील माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरेश मानकवणे (४७) या चाळमालकाला अटक केली आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुरेश मारूचा मृतदेह फरफटत नेत असल्याचे आढळून आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
मारूची हत्या कोणी केली, सुरेशशी त्याचा काही संबंध आहे का, याची चौकशी पोलीस करीत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 10, 2014 4:23 am