24 October 2020

News Flash

वांद्रे वरळी सी-लिंकवरून उडी मारून तरूणाची आत्महत्या

दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे.

संग्रहित छायाचित्र

वांद्रे वरळी सी-लिंकवरून एका तरूणाने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली. पार्थ सोमाणी असे संबंधित तरूणाचे नाव असून सध्या तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून त्याचा शोध घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, टॅक्सीने प्रवास करत असताना टॅक्सी थांबवण्यास सांगून सदर तरूणाने समुद्रात उडी घेतली.

पार्थ हा मुलुंड येथील रहिवासी असून तो एका सीए फर्ममध्ये काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे. पार्थ याने टॅक्सीतून प्रवास करताना सी-लिंकवर गाडी थांबवण्यास सांगितली आणि उतरून समुद्रात उडी घेतली.

दरम्यान, तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून संध्याकाळी उशीरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. परंतु तटरक्षक दलाच्या जवानांना आणि पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले नाही. दरम्यान, अंधारानंतर ही शोध मोहीम थांबवण्यात आली असून उद्या सकाळी पुन्हा शोध घेतला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 7:50 pm

Web Title: boy suicides bandra worli sea link stopped taxi jumped jud 87
Next Stories
1 Video: गटारात वाहून गेलेल्या दिव्यांशचा तीस तासांनंतरही शोध सुरुच
2 मुंबईचे डबेवाले आज आणि उद्या सुट्टीवर
3 आषाढी एकादशी: वडाळ्यातील प्रतिपंढरपूरात विनोद तावडेंची विधीवत विठ्ठल पूजा
Just Now!
X