12 August 2020

News Flash

शाहरुखचा निषेध, पण चित्रपटावर बहिष्कार नाही- राज ठाकरे

समाजमाध्यमांत राज यांच्या स्पष्टीकरणाचे प्रसिद्धीपत्रक फिरू लागले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे.

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे जे आवाहन केले जात आहे ती पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. शाहरुखने चेन्नई पूरग्रस्तांना १ कोटींची मदत जाहीर केल्यानंतर मनसेने शाहरुखला महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांचा विसर पडल्याचे सांगत त्याच्या आगामी ‘दिलवाले’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये होते. त्यानंतर मंगळवारी समाजमाध्यमांत राज यांच्या स्पष्टीकरणाचे प्रसिद्धीपत्रक फिरू लागले आहे.
मनसेच्या आवाहनाला शाहरूखने असे दिले प्रत्युत्तर
शाहरुखने चेन्नई पूरग्रस्तांना १ कोटींची मदत केली, पण तो महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना विसरला म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने केलेला निषेध हा योग्य आहे. मात्र, त्याच्या चित्रपटावरील बहिष्कार टाकण्याचे करण्यात आलेले आवाहन पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे राज ठाकरे यांनी  स्पष्टीकरणात म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रात यायचं, मोठं व्हायचं, नाव कमवायचं आणि मग महाराष्ट्रालाच विसरायचं हे योग्य नाही. ही जाण त्यांनी ठेवली पाहिजे, असंही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2015 2:04 pm

Web Title: boycott dilwale its not party official decision says raj thackeray
टॅग Raj Thackeray
Next Stories
1 मनसेच्या आवाहनाला शाहरूखने असे दिले प्रत्युत्तर
2 वाढीव फेऱ्यांचा ‘२० हजारी’ फायदा!’
3 ‘त्यांची’ २३ वर्षे लढाई सुरू..
Just Now!
X