शासनाची एकाधिकारशाही व दडपशाहीचा निषेध म्हणून मुरबाड तालुक्यात प्रस्तावीत असलेल्या काळू धरण प्रकल्पग्रस्त गावांनी येत्या लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.  भिवंडी लोकसभा मतदार संघात मोडणाऱ्या मुरबाडमधील तळेगांव, जडई, फांगळोशी, खुटल, चासोळे, न्याबाडी, उमरोली, खरशेत, आनंदपूर, दिघेफळ आदी गावांचा त्यात समावेश आहे.