सर्वांचा लाडका २३ तारखेला गणपती बाप्पा आपला निरोप घेणार आहे. मुंबईतील गणेश विसर्जनावर पावसाचं सावट आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने येत्या ४८ तासांत मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, आणि रायगडमध्ये वीजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

बुधवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने मुंबईकरांची तारंबळ उडवली होती. बुधवारी पहाटे तीन ते पाच या वेळेत दादर, वरळी आणि वडाळामध्ये ५० मीमी आसा विक्रमी पाऊस पडला होता. अंधेरी, बोरवली, मुलुंड, भांडूप, ठाणे, अंबरनाथ, बदलापूर या भागातही मोठ्याप्रमाणावर पाऊस झाल्याने ठिकठिकाणी पाणी साचले होते. आज गुरुवार पहाटेपासूनच ढग जमून आले आहेत. काही ठिकाणी पावसाच्या सरीही कोसळल्या आहेत.  हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य-महाराष्ट्रातील ठिकाणी २१ तारखेपासून पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.